Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज सूट-बूट घालून टेचात आले, अर्धा किलो सोनं उचलून फरार झाले ! थरारक...

सूट-बूट घालून टेचात आले, अर्धा किलो सोनं उचलून फरार झाले ! थरारक चोरीचा व्हिडीओ व्हायरल… कुठे घडला हा प्रकार ?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नवी दिल्ली | 29 सप्टेंबर 2023 : राजधानी दिल्लीतील लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. एका नामवंत ज्वेलर्सच्या शोरूममध्ये २५ कोटींची चोरी होऊन काही दिवस उलटत नाहीत तोच आणखी एका ज्वेलर्समध्येही चोरी झाली आहे.. समयपुर बादली भागात ज्वेलरी शोरूममध्ये झालेल्या चोरीच्या (robbery) थरारक घटनेचे CCTV फुटेज समोर आले आहे. अवघ्या दीड मिनिटांचा आत चोरांनी माल लुटून ते बाईकवरून फरार झाल्याचे या फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसले.

27 सप्टेंबर रोजी चोरीची ही घटना घडली. सुटा- बुटामध्ये आलेल्या आणि हेल्मेट व मास्कनी तोंड झाकलेल्या तिघा चोरांनी बंदूकीचा धाक दाखवत दुकानातील माल लुटला. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे. शोरूममधील स्टाफ तसेच खरेदीसाठी आलेल्या इतर ग्राहकांची अक्षरश: पाचावर धारण बसली होती. अवघ्या काही वेळात माल लुटला आणि ते तिघेही बाईकवरून फरार झाले.

तिथे नेमक काय झालं ?

राजधानी दिल्लीतील समयपुर बादली भागात बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास ही लूट झाली. तेथील श्रीराम ज्वेलरीच्या शोरूममध्ये काही महिला खरेदीसाठी आल्या होत्या. दुकानातील काही कर्मचारी त्यांना दागिने दाखवत होते तर काही जण खुर्चीवर बसून इतर काम करण्यात मग्न होते. दुपारच्या सुमारास सूट-बूट आणि डोक्यावर हेल्मेट, मास्क घातलेल्या तीन बंदूकधारी व्यक्ती ज्वेलर्सच्या दुकानात घुसल्या.

त्यातील एका माणसाच्या हातात मोठी बॅग होती. शोरूममध्ये आल्यावर त्यांनी सर्वांसमोर बंदूक ताणली आणि धाक दाखवत दुकानातील किमती माल, दागिने देण्यास सांगितले. हे पाहून कर्मचारी आणि ग्राहकांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी थेट हातच वर केले. एका चोराने तर कर्मचाऱ्याला थप्पडही लगावली. त्यानंतर दुसऱ्या चोराने ज्वेलरी बॉक्स उचलून हातातील बॅगमध्ये भरण्यास सुरूवात केली. मौल्यवान दागिने भरून ते तिघेही शोरूमच्या बाहेर पडले आणि बाईकवर बसून वायू वेगाने फरार झाले.

अर्धा किलो सोनं लुटलं

लुटीच्या या घटनेमुळे घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी कसाबसा पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि पाहणी केली, त्यांनी सीसीटीव्ही फुटेजही तपासले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चोरांनी दुकानातून सुमारे 480 ग्राम म्हणजे जवळपास अर्धा किलो सोन आणि इतर मौल्यवान वस्तू लुटल्या. दुकानातून बाहेर पडल्यावर त्यांनी बंदूकीतून हवेत फायरिंगही केले होते. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत असून गुन्हेगारांचा शोध घेत आहेत.

अर्धा किलो सोनं चोरी

पुलिस के मुताबिक, बदमाश दुकान से 480 ग्राम सोना चोरी करके ले गए हैं. डीसीपी आउट नॉर्थ के मुताबिक बाइक से फरार होने के दौरान बदमाश हवा में फायर भी किया था.

राजधानीत चोरांची ‘धूम’, 25 कोटींचे हिऱ्याचे, सोन्याचे दागिने पळवले

याच घटनेपूर्वी सोमवारी राजधानीत चोरीची आणखी एक मोठी घटना घडली. एका ज्वेलरी शोरूममध्ये भिंत फोडून चोरटे घुसले आणि मोठ्ठ घबाड पळवलं. चोरांनी कोट्यवधी रुपयांच दागिने लुटून पोबारा केला. शोरूममध्ये २५ कोटी रुपयांची चोरी झाली. रविवारी रात्री जंगपुरा येथील ज्वेलरी शॉपमध्ये चोरट्यांनी डाव साधला. सोमवारी शोरूम बंद असते. हीच संधी साधून रविवारी चोरट्यांनी लूट केली. मंगळवारी सकाळी दुकानाचे मालक नेहमीप्रमाणे दुकान उघडायला गेले. शोरूमचे शटर उघडल्यानंतर समोरचे दृश्य पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले. स्ट्रॉंग रूमजवळील शोरूमच्या भिंतीला मोठे छिद्र पडले होते. चोरांनी सोन्या चांदीचे हिऱ्याचे दागिने असे मिळून साधारण 25 कोटींचा माल लुटल्याचे समोर आले.

RELATED ARTICLES

शिरूर तालुक्यातील निर्वी येथे अपघातात साठ वर्षीय महिलेचा मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) न्हावरे : निर्वी (ता. शिरूर) गावाच्या हद्दीत निर्वी - कोळगाव डोळस रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोने दुचाकीला धडक देऊन झालेल्या...

पुणे महापालिकेची कारवाई; रस्ते, पदपथ ठिकठिकाणी आढळणारी १३९ बेवारस वाहने जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : महापालिकेच्या हद्दीत रस्ते, पदपथावर ठिकठिकाणी आढळणाऱ्या बंद अथवा बेवारस अवस्थेतील वाहनांविरोधात महापालिका कारवाई करत आहेत. सुरुवातीला या...

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) राजगुरुनगरः चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

शिरूर तालुक्यातील निर्वी येथे अपघातात साठ वर्षीय महिलेचा मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) न्हावरे : निर्वी (ता. शिरूर) गावाच्या हद्दीत निर्वी - कोळगाव डोळस रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोने दुचाकीला धडक देऊन झालेल्या...

पुणे महापालिकेची कारवाई; रस्ते, पदपथ ठिकठिकाणी आढळणारी १३९ बेवारस वाहने जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : महापालिकेच्या हद्दीत रस्ते, पदपथावर ठिकठिकाणी आढळणाऱ्या बंद अथवा बेवारस अवस्थेतील वाहनांविरोधात महापालिका कारवाई करत आहेत. सुरुवातीला या...

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) राजगुरुनगरः चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२...

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा; पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील सर्व आस्थापनांच्या पाट्या देवनागरी लिपीत...

Recent Comments