इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, नंदुरबारच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नंदुरबार येथे कंत्राटी लेखापाल या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नांदेड येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय परिसर, टोकरतलाव रोड, नंदुरबार 425412 येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 25000 हजार रुपयांपर्यंत पगारही मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://districts.ecourts.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.