Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजसुप्रिया सुळे आणि राजवर्धन पाटील यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण

सुप्रिया सुळे आणि राजवर्धन पाटील यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

इंदापूर : खासदार सुप्रिया सुळे आणि इंदापूर तालुक्याचे युवा नेते राजवर्धन पाटील यांची मुंबईमध्ये एका लग्न सोहळ्यात भेट झाली आहे. या भेटीने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने हर्षवर्धन पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केल्याचे दिसत आहे.

इंदापूर विधानसभेची जागा ही महायुतीमध्ये स्टैंडिंग आमदार या निकषानुसार विद्यमान आमदारांकडे जाईल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी “विधानसभा निवडणूक हर्षवर्धन पाटील लढविणार, जिंकणार व गुलाल आमचाच”, अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे व राजवर्धन पाटील यांच्या भेटीने विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्ष हा हर्षवर्धन पाटील यांना मदत करणार का, अशी चर्चा इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.

पवार साहेब हर्षवर्धन पाटलांना सहकार्य करणार?

जेष्ठ नेते शरद पवार व हर्षवर्धन पाटील यांचे असलेले चांगले व्यक्तिगत संबंध राज्याला माहित आहेत. अशातच आता खा. सुप्रिया सुळे व राजवर्धन पाटील यांच्या झालेले भेटीने पवारसाहेब हे इंदापूर विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना सहकार्य करणार का अशीही चर्चा जोर धरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments