इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
केज: सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाशी संबंधित खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मीक कराडने खंडणी मागितल्याचा कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती लागला नव्हता. पण आता त्याने खंडणी मागितल्याचा पुरावा असणारा सुदर्शन घुलेचा एक महत्त्वाचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला असल्याचा दावा काही वृत्तवाहिन्यांनी केला आहे. या वृत्तानुसार, आरोपी सुदर्शन घुले हा वाल्मीक कराडचे नाव घेत खंडणी मागताना दिसून येत आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणी पोलिसांनी केज न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात वाल्मीक कराड हा देशमख हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी खंडणी प्रकरणातूनच देशमुखांची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. मात्र बचाव पक्षाने हा आरोप फेटाळून लावला आहे. विशेषतः वाल्मीक कराडने स्वतः खंडणी मागितल्याचा कोणताही पुरावा नाही असा दावा त्यांनी केला होता. पण आता सुदर्शन घुलेचा वाल्मीक कराडचे नाव घेऊन खंडणी मागितल्याचा एक व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे.