Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज सिरीयातून आदेश, पुण्यात आयसिसचा बॉम्बस्फोटांचा कट, चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती उघड

सिरीयातून आदेश, पुण्यात आयसिसचा बॉम्बस्फोटांचा कट, चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती उघड

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : दहशतवादी विचारधारेचा प्रसार, तसेच तरुणांची माथी भडकावून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये ओढणाऱ्या आयसिसच्या महाराष्ट्र गटाकडून पुण्यात साखळी बॉम्बस्फोट घडविण्याचा कट दहशतवाद्यांनी रचला होता. आयसिसच्या महाराष्ट्र गटातील दहशतवाद्यांना सिरीयातून याबाबतच्या सूचना मिळाल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ताब्यात घेतलेला दहशतवादी मोहम्मद शाहनवाज आलम याने एनआयएच्या अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान ही माहिती दिल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

एनआयएने सहा दिवसांपूर्वी कोढव्यातून पसार झालेला दहशतवादी मोहम्मद शाहनवाज आलम उर्फ शफिकूर रहमान आलम (रा. हजारीबाग, झारखंड) याला नुकतीच अटक केली. आलमला एनआयएच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. आलमची एनआयच्या पथकाने चौकशी केली. तेव्हा पुण्यात साखळी बॉम्बस्फोट करण्याचा कट रचला होता. याबाबत सिरीयातून सूचना मिळाल्याची माहिती त्याने एनआयएच्या अधिकाऱ्यांना चौकशीत दिली. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या सात दहशतवाद्यांकडून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबईतील विशेष न्यायालयात नुकतेच आरोपपत्र दाखल केले.

जुलै महिन्यात पुण्यातील कोथरुड भागात दुचाकी चोरताना इम्रान खान, मोहम्मद साकी, मोहम्मद आलम यांना अटक करण्यात आली होती. कोंढव्यात आरोपी साकी, खान, आलम वास्तव्यास होते. त्यांच्या घराची झडती घेण्यात आली. तपासात तिघे दहशतवादी आयसिसच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले होते. महाराष्ट्र, गोवा, तेलंगणात आयसिसच्या विचारधारेचा प्रसार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविण्यात आले होते. दहशतवाद्याकडून पिस्तूल, स्फोटके सापडले होते. दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्यासाठी कोंढव्यात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बाँम्बस्फोट घडविल्यानंतर अटक टाळण्यासाठी त्यांनी दुर्गम भागात लपण्याची जागा शोधली होती. पुण्यातील महत्वाच्या लष्करी संस्थांच्या परिसराचे त्यांनी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण केले होते, असे एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.

यामध्ये मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान उर्फ मटका उर्फ अमीर अब्दुल हमीद खान, मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी उर्फ आदिल उर्फ आदिल सलीम खान (दोघे रा. रतलाम, मध्यप्रदेश), कादीर दस्तगीर पठाण उर्फ अब्दुल कादीर (रा. कोंढवा), समीब नासीरउद्दीन काझी (रा. कोंढवा), जुल्फीकार अली बडोदावाला उर्फ लालाभाई उर्फ सईफ, शामिल साकीब नाचन, अकिफ आतिफ नाचन (तिघे रा. पडघा, जि. ठाणे) या दहशतवाद्यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायदा (यूएपीए), स्फोटके तयार करणे, बाळगणे (एक्सप्लोझिव्ह सबस्टन्स अॅक्ट), तसेच विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

शिरूर तालुक्यातील निर्वी येथे अपघातात साठ वर्षीय महिलेचा मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) न्हावरे : निर्वी (ता. शिरूर) गावाच्या हद्दीत निर्वी - कोळगाव डोळस रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोने दुचाकीला धडक देऊन झालेल्या...

पुणे महापालिकेची कारवाई; रस्ते, पदपथ ठिकठिकाणी आढळणारी १३९ बेवारस वाहने जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : महापालिकेच्या हद्दीत रस्ते, पदपथावर ठिकठिकाणी आढळणाऱ्या बंद अथवा बेवारस अवस्थेतील वाहनांविरोधात महापालिका कारवाई करत आहेत. सुरुवातीला या...

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) राजगुरुनगरः चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

शिरूर तालुक्यातील निर्वी येथे अपघातात साठ वर्षीय महिलेचा मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) न्हावरे : निर्वी (ता. शिरूर) गावाच्या हद्दीत निर्वी - कोळगाव डोळस रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोने दुचाकीला धडक देऊन झालेल्या...

पुणे महापालिकेची कारवाई; रस्ते, पदपथ ठिकठिकाणी आढळणारी १३९ बेवारस वाहने जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : महापालिकेच्या हद्दीत रस्ते, पदपथावर ठिकठिकाणी आढळणाऱ्या बंद अथवा बेवारस अवस्थेतील वाहनांविरोधात महापालिका कारवाई करत आहेत. सुरुवातीला या...

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) राजगुरुनगरः चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२...

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा; पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील सर्व आस्थापनांच्या पाट्या देवनागरी लिपीत...

Recent Comments