Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज सिक्किममध्ये मोठा विद्ध्वंस घडवणाऱ्या पुराच नेपाळच्या भूकंपाशी काय कनेक्शन ?

सिक्किममध्ये मोठा विद्ध्वंस घडवणाऱ्या पुराच नेपाळच्या भूकंपाशी काय कनेक्शन ?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नवी दिल्ली : सिक्किममध्ये 4 ऑक्टोबरला निसर्गाचा कोप दिसून आला. ल्होनक सरोवर परिसरात ढगफुटी झाली. त्यामुळे तीस्ता नदीला पूर आला. त्यामुळे सिक्किममध्ये मोठा विध्वंस झाला. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 14 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 22 जवानांसह 102 नागरिक बेपत्ता आहेत. या सगळ्यांचा शोध सुरु आहे. ढगफुटीची ही घटना घडण्याच्या एकदिवस आधी नेपाळमध्ये मोठा भूकंप आला होता. या भूकंपाची तीव्रता 6.2 रिश्टर स्केल होती. दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात या भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळमधल्या या भूकंपामुळे सिक्किममध्ये पूर आला का? असा प्रश्न आता विचारला जातोय.

नुकताच नेपाळमध्ये मोठा भूकंप झाला. त्यात मोठ नुकसान झालं. “नेपाळमधील या भूकंपामुळे सिक्किममध्ये अचानक इतका मोठा पूर आल्याची शक्यता आहे” असं केंद्रीय जल आयोगाच्या (सीडब्ल्यूसी) एक वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलय अधिकाऱ्याने सांगितलं की, “168 हेक्टरमध्ये पसरलेलं ल्होनक सरोवर आधीपासून असुरक्षित होतं. नदीच क्षेत्रफळ आणखी कमी होऊन आता 60 हेक्टर राहिलय”

नेपाळच्या भूकंपाशी खरच काही कनेक्शन आहे का?

नेपाळमधील भूकंप सिक्किममधल्या पुराच कारण असू शकतो असं काही एक्सपर्ट्सच मत आहे. वैज्ञानिक सध्या सिक्किममध्ये अचानक इतका मोठा पूर कशामुळे आला? त्यामागे काय कारण आहेत? नेपाळच्या भूकंपाशी खरच काही कनेक्शन आहे का? याचा शोध घेत आहेत. सध्या सिक्किममध्ये मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे. अडकलेल्या लोकांना बाहेर काढल जातय. पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवल जातय. प्रशासन आणि सैन्य मदत कार्यात गुंतलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांच्याशी फोनवरुन चर्चा केली व शक्य ती सर्व मदत करण्याच आश्वासन दिलय.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments