Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजसिंहगड रोडवर पुन्हा अपघात...! रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेला सिमेंट मिक्सरची धडक

सिंहगड रोडवर पुन्हा अपघात…! रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेला सिमेंट मिक्सरची धडक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. सिंहगड रस्ता परिसरातील विश्रांतीनगर चौकात रस्त्यावरून पायी चालत जाता असणाऱ्या महिलेला सिमेंट मिक्सरने धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघात एक महिला जखमी झाली आहे.

आशा नितीन पुरोहित (वय-५६ वर्षे, रा. गणेश अपार्टमेंट, हिंगणे खुर्द, पुणे) असे जखमी महिलेचं नाव असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज (दि. १७) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सिंहगड रस्ता परिसरातील विश्रांतीनगर चौकात घडली.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सिंहगड रास्ता परिसरात विश्रांतीनगर येथे प्रकाश इनामदार चौकात हा अपघात घडला आहे. राजाराम पुलांकडून हिंगणेच्या दिशेने येणाऱ्या सिमेंट मिक्सरने पायी रस्त्याने जात असलेल्या आशा पुरोहित यांना धडक दिली. या अपघातात त्यांच्या हात व पायाला मोठी दुखापत झाली आहे. जखमी अशा पुरोहित यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, पुणे शहरात सिमेंट मिक्सर खाली सापडून अपघात होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वीही एका महिलेचा सिमेंट मिक्सरखाली सापडून अपघात झाला होता. आज पुन्हा याच परिसरात अपघात घडला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments