Thursday, November 7, 2024
Homeक्राईम न्यूजसिंहगड रोडचे कुख्यात गुंड चेतन लिमन ऊर्फ मामा टोळीतील दोन रेकॉर्डवरील सराईत...

सिंहगड रोडचे कुख्यात गुंड चेतन लिमन ऊर्फ मामा टोळीतील दोन रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारानां अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

दिनांक २१/१०/२०२४ रोजी पोलीस उपनिरीक्षक, सुरेश जायभाव, पोलीस हवालदार ६७१८ गिरीगोसावी, सोबत सी आर मोबाईलवर वरील पोलीस हवालदार/७७६० मालुसरे व पोलीस शिपाई/१०१३८ सागर असे सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर अंकित बडगाव पोलीस चौकीचे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना २०.१५ वा. सुमारास पोलीस शिपाई /१०१३८ सागर यानां त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, कॅनील रोड तुकाई नगर जवळ, वडगाव, पुणे येथे कॅनोलचे कडेला दोन इसम गावठी पिस्टल घेवुन थांबलेले आहेत, अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमीचा आशय पोलीस शिपाई/१०१३८ सागर यानी सुरेश जायभाय, पोलीस उपनिरीक्षक यानां सांगितले असता, सुरेश जायभाय, पोलीस उपनिरीक्षक यांनी मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक सती, सिंहगडरोड पोलीस ठाणे, पुणे शहर यांना कळविली असता मा.यपोनि यांनी बातमीप्रमाणे खात्री करुन योग्य ती कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले त्याप्रमाणे सी आर मोबाईल वाहनाने कैनोल रोड चुकाई नगर जवळ, वडगाव, पुणे येथे आली असता तेथे कैनोलचे कडेला वाहन उभी करून उतरून कॅनोलचे दिशेने आड बाजुला थांबुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री केली असता कैनाल रोड तुकाई नगर जवळ, वडगाव, पुणे येथे कैनोलचे बाजुला बातमीतील वर्णनाचे दोन इसम उभे असल्याचे दिसले त्यांना आमची चाहुल लागताच ते दोघे इसम पळून जाऊ लागल्याने स्टाफचे मदतीने त्यांचा पाठलाग करुन काही अंतरावर त्यांना २०.३० वा. चे सुमारास पकडुन त्यांना नाव व पत्ता विचारता सदर इसमांची नाव व पत्ता सुरज महेंद्र नांगरे वय-२१ वर्षे रा. किरकटवाडी, समाज मंदिर पाठीमागे, ता हवेली जि. पुणे तर इसमास त्याचे नाव व पत्ता साहील मनिष सोनवणे यय- २२ वर्षे रा.मु.पो. किरकटवाडी, ता- हवेली जि. पुणे असे असल्याचे सांगितले. त्यांची अंगझडती घेता इसम नागे सुरज महेंद्र नांगरे वथ-२१ वर्षे याचे उजवे कमरेजवळ पॅन्टचे आतमध्ये कोचलेले एक देशी बनावटीचे एक पिस्टल व मॅगझीन व तर इसम नामे साहील मनिष सोनवणे वय २२ वर्षे याचे पॅन्टचे डावे खिशात त्यामध्ये दोन जिवंत काडतुसे मिळाली आहे. तेव्हा त्यांचेकडे सदरचे शस्त्र

परवान्याबाबत विचारपूस करता त्याने शस्त्र परवाना नसल्याचे सांगीतले. तरी त्याचे विरूध्द पोलीस हवालदार ६७१८ गिरीगोसावी यांनी आर्म अॅक्ट कलम ३ (२५), तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) (३) सह १३५ प्रमाणे तक्रार दिलेली असुन सुरेश जायभाय, पोलीस उपनिरीक्षक यांनी आरोपीनां अटक केलेली आलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरेश जायभाय, पोलीस उपनिरीक्षक, सिंहगडरोड पोलीस स्टेशन, पुणे शहर हे करीत आहेत

सदरची कामगिरी ही मा.श्री अजय परमार सहा. पोलीस आयुक्त सिंहगडरोड विभाग पुणे शहर, मा.श्री राघवेंद्र क्षीरसागर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पो.स्टे. पुणे शहर, व मा श्री उत्तम भजनायळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शानाखाली सुरेश जायभाय पोलीस उपनिरीक्षक, सिंहगड रोड पो.स्टे.पुणे शहर व पोलीस हवालदार ६७१८ गिरीगोसावी, पोलीस हवालदार/७७६० मालुसरे व पोलीस शिपाई/१०१३८ सागर यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments