Tuesday, February 27, 2024
Home क्राईम न्यूज सिंहगड रस्त्यावर कोयताधारी टोळक्याचा धुडगूस; कोयत्याने वार केल्याने एक जण गंभीर जखमी

सिंहगड रस्त्यावर कोयताधारी टोळक्याचा धुडगूस; कोयत्याने वार केल्याने एक जण गंभीर जखमी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पर्वती पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सिंहगड रस्त्यावरील पानमळा वसाहत या ठिकाणी कोयताधारी टोळक्याने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भर रस्त्यात धुडगूस घातल्याचा उघडकीस आले आहे. या टोळक्याने कोयत्याने वार केल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सराईत गुन्हेगारासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोन्या खुळे (राहणार सावित्रीबाई फुले वसाहत सिंहगड रोड) या सराईत गुन्हेगारासह आदित्य चव्हाण तुषार कदम आणि पियुष अशा चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण बाळू निमसे या तरुणाने याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि त्याचे मित्र सिंहगड रस्त्यावरील पानमळा वसाहत येथील बुद्ध विहारासमोर गप्पा मारत थांबले होते. यावेळी आरोपी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. फिर्यादी यांनी त्याला विरोध केला असता आमच्या भांडणामध्ये येतोय काय? थांब आता तुला खलासच करून टाकतो असे बोलून कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला.

फिर्यादी यांनी हाताने कोयता पकडला असता आरोपींनी त्याला लाथाबुक्क्यानी मारले. तर आरोपी आदित्य चव्हाण यांनी फिर्यादीला ठार मारण्याचा उद्देशाने डोक्यावर पाठीवर आणि छातीवर कोयत्याने वार केले. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत. पर्वती पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

पुण्यातील नशेचा हादरवणारा व्हिडिओ, वेताळ टेकडीवर नशेत गुंग तरुणी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) प्रत्येक पुणेकरांना विचार करण्याची वेळ आली आहे. अन्यथा शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे शहर उडता पंजाब होईल, नशेचे माहेरघर होईल,...

जेवण वाढताना वाद; महिलेकडून पतीवर चाकूने वार, भवानी पेठेतील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : जेवण वाढताना वाद झाल्याने महिलेने पतीवर चाकूने वार केल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली. याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा...

पुणे : मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट; कामगार संघटनांकडून बंद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : माथाडी कायद्याची राज्यभरात काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसेच बाजार समितीचे केंद्रीकरण करणारे २०१८ चे विधेयक (राष्ट्रीय दर्जा बाजार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पुण्यातील नशेचा हादरवणारा व्हिडिओ, वेताळ टेकडीवर नशेत गुंग तरुणी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) प्रत्येक पुणेकरांना विचार करण्याची वेळ आली आहे. अन्यथा शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे शहर उडता पंजाब होईल, नशेचे माहेरघर होईल,...

जेवण वाढताना वाद; महिलेकडून पतीवर चाकूने वार, भवानी पेठेतील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : जेवण वाढताना वाद झाल्याने महिलेने पतीवर चाकूने वार केल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली. याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा...

पुणे : मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट; कामगार संघटनांकडून बंद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : माथाडी कायद्याची राज्यभरात काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसेच बाजार समितीचे केंद्रीकरण करणारे २०१८ चे विधेयक (राष्ट्रीय दर्जा बाजार...

पुण्यातील तरुणाई ड्रग्सच्या नशेत? रमेश परदेसींकडून हादरवून टाकणारा व्हिडीओ समोर

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक (Pune Drugs) आणि राज्याला हादरवून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. पुण्यातील...

Recent Comments