Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज सासूने दिलेल्या सल्ल्यामुळे करीना कपूर हिने घेतला मोठा निर्णय, त्यानंतर....

सासूने दिलेल्या सल्ल्यामुळे करीना कपूर हिने घेतला मोठा निर्णय, त्यानंतर….

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

Aishwarya Rai | अभिनेत्री करीना कपूर हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. करीना हिच्यानंतर बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी पदार्पण केलं. पण झगमगत्या विश्वात असलेली बेबोची जागा कोणीही घेवू शकलं नाही. करीना फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. करीना कायम तिच्या कुटुंबाबद्दल चाहत्यांना अनेक गोष्टी सांगत असते. आता देखील अभिनेत्रीने चाहत्यांना एक मोठं सत्य सांगितलं आहे. अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत लग्न करण्याआधी अभिनेत्रीला सासूने एका सल्ला दिला होता. ‘तो’ सल्ला कोणता होता जाणून घेवू ज्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली आहे.

अभिनेत्री करीना कपूर खान हिने स्वतः पेक्षा १० वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सैफ अली खान हा दोन मुलांचा वडील होता. सैफ याच्यासोबत लग्न केल्यामुळे अभिनेत्रीला अनेक गोष्टीचा सामना करावा लागला होता. आहे अभिनेत्री सैफ याच्यासोबत लग्न करण्यापूर्वी समोर आलेल्या प्रसंगांबद्दल सांगितलं आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘मला प्रत्येकाने विचारलं लग्न का करत आहेस लग्नानंतर तुझं करियर पूर्णपणे संपूर्ण जाईल. तुला कोणी विचारणार नाही. पण मी पूर्णपणे सैफ अली खान याच्या प्रेमात होती. जर दिग्दर्शक, निर्माते यांना वाटत असेल लग्नानंतर माझं करियर संपेल तर, त्यामध्ये फक्त त्यांचं नुकसान होतं….

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘लग्नासाठी अनेकांचा नकार होता. पण माझ्या सासूबाईंनी माझा आत्मविश्वास कमी होवू दिला नाही. त्यांनी मला एक सल्ला दिला. अशा कोणत्याच गोष्टींवर लक्ष देवू नको. स्वतःला आव्हान दे आणि पूर्ण कर.. ज्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला….. कारण लग्नानंतर मला फक्त करियरकडे नाही तर माझ्या घाराकडे देखील लक्ष द्यायचं होतं. ‘सध्या सर्वत्र करीना कपूर हिची चर्चा रंगली आहे..

करीना हिच्या सासूबाईंबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात घर केलं. शर्मिला टागोर यांनी लग्नानंतर देखील अनेक सिनेमांमध्ये काम केलं. जेव्हा शर्मिला टागोल यांनी ‘दाग’ आणि ‘वक्त’ यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली तेव्हा शर्मिला यांचं लग्न झालं होतं. शिवाय त्यांनी सैफ अली खान याला देखील जन्म दिला होता.

करिना कपूर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, लग्नानंतर देखील करीना कपूर हिने अनेक हीट सिनेमांमध्ये काम केलं. आता अभिनेत्री ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. करीना लवकरच “जाने जान’ सिनेमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. अभिनेत्रीचा ‘जाने जान’ सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments