इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
सासवड : सासवड येथील न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे २८सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. सदर लोक अदालतीमध्ये दिवाणी दावे व फौजदारी खटले तडजोडीसाठी ठेवलेले होते. तसेच बँका, महावितरण कंपनी, पंचायत समिती, ग्रामपंचायती इत्यादींचे वसूली प्रकरणे ठेवलेली होती. सदर लोक अदालतीमध्ये एकूण ७५ दिवाणी व फौजदारी स्वरूपाचे दावे व खटले निकाली निघाले असून ९८ लाख ६७ हजार ४२४ रूपयांची वसूली करण्यात आली आहे.
सदर कार्यक्रमास सासवड न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बिलाल, सहन्यायाधीश देशमुख, सहन्यायाधीश भरड हजर होते. सदर कार्यक्रमाच्या वेळी सासवड बार असोसिएशनचे अध्यक्ष वकील अविनाश भारंबे, उपाध्यक्ष वकील सचिन कुदळे, सचिव वकील सुनिल कटके, सहसचिव वकील ज्योती जगताप, खजिनदार वकील अक्षय नाझीरकर तसेच बँकांचे कर्मचारी, नगरपालिकेचे कर्मचारी, पंचायत समितीचे कर्मचारी, महावितरण कंपनीचे कर्मचारी, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, महामार्ग पोलिस व न्यायालयीन कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. सदर लोक अदालतीमध्ये पॅनल जज म्हणून वकील दिलीप निरगुडे, वकील कलाताई फडतरे, वकील ज्योती जगताप यांनी काम पाहिले.