Thursday, March 20, 2025
Homeक्राईम न्यूजसासवड पोलिसांनी दिवे विद्यालयातील मुलांना दिले कायदेविषयक धडे..

सासवड पोलिसांनी दिवे विद्यालयातील मुलांना दिले कायदेविषयक धडे..

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

सासवड प्रतिनिधी : वाढती गुन्हेगारी, अपघात, फसवणूक,व्यसनाधीनता, अवैध धंदे या अनुषंगाने सरकारने आता नवीन व अत्यंत कठोर न्यायसंहिता अंमलात आणली आहे. त्याची व्याप्ती, परिणाम व ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने सासवड पोलिस स्टेशनच्या वतीने पुरंदर तालुक्यातील दिवे येथील कातोबा विद्यालयातील ईयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर अशा व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सासवड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव सोनवणे यांनी या निमित्ताने उपस्थीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

विनापरवाना गाडी चालवणे, सायबर क्राईम, मारामारी, चोऱ्या या आणि या सारख्या अनेक अपराधांवर आता कडक कायदे केले असुन छोट्या छोट्या प्रकरणातही तुरुंगवास भोगावा लागतो यासाठी सर्वांनी योग्य खबरदारी घ्यावी असे आवाहन सोनवणे यांनी केले. शालेय विद्यार्थ्यांनी याविषयी अधिक जागरूकता निर्माण करावी असेही वैभव सोनवणे यांनी सांगितले. गुप्तवार्ता विभागाचे रुपेश भगत याप्रसंगी उपस्थित होते. विविध शाळा महाविद्यालयातून अशा स्वरुपातील मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सासवड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी या निमित्ताने सांगीतले.

विद्यालयातील विविध उपक्रम व वार्षिक पारितोषिक वितरण देखील या प्रसंगी वैभव सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक दादासो साठे, यांसह सर्व शिक्षक वृंद या प्रसंगी उपस्थित होते. सतीश कुमदाळे यांनी सुत्रसंचालन तर सुजाता काळभोर

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments