इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
सासवड : पुरंदर तालुक्यातील पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातीलपाणीसाठा हा कमी होत चालला आहे. बऱ्याच धरणातील पाणीसाठा तीस ते पंचेचाळीस टक्के असून, पाणीटंचाई आत्ताच जाणवू लागली आहे. तर गावागावातील पाणीपुरवठा योजना या बऱ्याच प्रमाणात अडचणीत आल्या आहेत. आता तरी उन्हाची तीव्रता जास्त असून दिवसेंदिवस त्यांच्या झळा पोहचत आहेत. त्यामुळे पाण्यावर विपरीत परिणाम होऊन, धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झालेला दिसून येत आहे. त्यामुळे 15 मार्चनंतर सासवड नगरपरिषदेकडून दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय होईल असे वर्तवण्यात आलेले आहे.
सध्या तरी गराडे घोरवडी व वीर धरणातून सासवड शहराला पाणीपुरवठा होत आहे. परंतु गराडे धरणात 30 टक्के घोरवडी धरणात 45 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या योजना बरोबरच ग्रामीण भागातील गावांना सुद्धा पाणीपुरवठा चालू आहे. सायफन पद्धतीमुळे सासवडला पाणी मिळत असल्याकारणाने वीज बिलात बचत होत आहे. घोरवडी धरणातून सासवड, पिंपळे, पोमननगर, सुपे, भिवडी, पूर पोखर, दिवे या प्रादेशिक योजनेसाठी पाणी चालू आहे.
गराडे धरणातून सासवड, कोडीत, चाबळी, हिवरे, बोपगाव अशा विविध गावांना पाणीपुरवठा चालू आहे. हा पाणीसाठा ग्रामीण भागातील गावांना घोरवडी, गराडे धरणाच्या असणाऱ्या पाणीसाठा तीस ते पंचेचाळीस टक्के असणारा शिल्लक ठेवावा व सासवड नगरपरिषदेने वीर धरणातून पाणी मुबलक असल्याकारणाने 15 मार्च नंतर चालू करावे, अशी ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांची प्रतिक्रिया आहे.
गराडे धरणातील जेवढे राखीव पाणी आहे, तेवढेच सासवडसाठी घेत आहोत. परंतु काही दिवसात ते पाणी बंद केले जाईल. घोरवडीतून पाणी मिळावे, म्हणून जलसंपदा विभागाला प्रस्ताव दिला आहे. आत्ता सध्या तरी सासवडला एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. तर 15 मार्च नंतर दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन चालू आहे. सध्या तरी वीर धरणात मुबलक पाणी असल्याने, यावर्षी पाण्याची अडचण येणार नाही. कांबळवाडीतील पंपाचे काम केले असून, पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे अशी माहिती सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी दिली आहे.