इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
सासवड : सासवड आगारातील एस टी कामगार संघटनेच्या सचिवपदी महेश सुरेश भोंगळे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या अंतर्गत कार्यरत या संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भोंगळे यांची निवड झाली आहे.
सुरेश ज्ञानोबा कडू यांची संघटनेचे अध्यक्ष तर कैलास कुमार जगताप यांची कार्याध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली आहे. संघटनेचे राज्याचे नेते हनुमंतराव ताटे व संदिप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड आगारातील कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी संघटना यापुढेही कायम अग्रभागी राहील असा विश्वास नवनियुक्त सचिव महेश भोंगळे यांनी व्यक्त केला आहे.
याप्रसंगी संघटनेचे मावळते सचिव गणेश भुजबळ, रवि गरुड, पोपट जैनक, गणेश कामठे, प्रवीण पोमण, नितीन ओंबळे, कानिफनाथ जगताप, विकास काकडे यांसह कामगार संघटनेचे अनेक सभासद उपस्थित होते. भोंगळे, कडू व जगताप यांच्या निवडीबद्दल अनेकांनी त्यांचें अभिनंदन केले आहे