Tuesday, January 14, 2025
Homeक्राईम न्यूजसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भाषा भवनाची युवासेनेकडून पोलखोल; इमारतीचे काम अर्धवट स्थितीत

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भाषा भवनाची युवासेनेकडून पोलखोल; इमारतीचे काम अर्धवट स्थितीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नव्याने उभारण्यात आलेल्या मराठी भाषा भवनाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची युवासेनेकडून (उबाठा गट) बुधवारी पोलखोल करण्यात आली. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून इमारतीच्या अर्धवट कामाचे लोकार्पण करण्यात आल्याचा आरोप युवासेनेकडून करण्यात आला. या आंदोलनात शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे, युवासेना शहर अधिकारी राम थरकुडे, शहर समन्वयक युवराज पारीख, संघटक अजय परदेशी सहभागी झाले होते.

महाराष्ट्र दिनाच्या मुहर्तावर मराठी भाषा भवनचे लोकार्पण करण्यात आले. परंतु, त्या दिवसापासून आजपर्यंत मराठी भाषा भवनाचा एकाही विद्यार्थ्याला उपयोग झालेला नाही. आतील सर्व पुस्तके दोरीने बांधून ठेवलेल्या अवस्थेत असून या वास्तूला गळती लागल्याचे निदर्शनास आले आहे. या वास्तूत लाईट, पाणी, स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही. बसायला खुर्चा, टेबल नाही, उद्घाटनावर लाखो रुपये खर्च करूनही मराठी भाषा भवन वापरात येणार नव्हते, तर याचे लोकार्पण का करण्यात आले? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित करण्यात आला. त्याचप्रमाणे पुणे विद्यापीठाचे साडेसहाशे कोटींचे बजेट असून, या बजेटचा अपव्यय होताना दिसत आहे.

विद्यापीठाची मुख्य इमारत ही हेरिटेज वास्तूमध्ये गणली जाते. तरीही इमारतीला बेकायदेशीररीत्या होल मारून लाइट्स लावण्यात आले. त्याचा खर्च अडीच कोटी रुपये दाखवण्यात आला. तसेच विद्यापीठामध्ये फायबर ऑप्टिक केबल टाकण्यासाठी साडेचार कोटी रुपये खर्च करण्यात आले. परंतु, तशी केबल कुठेही टाकल्याचे किवा राउटर बसविल्याचे दिसून येत नाही, असा आरोप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments