इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा येत्या 25 मार्चपासून सुरू होणार आहेत. परीक्षेचे वेळापत्रक टप्प्याटप्याने ‘www.unipune.ac.in’ या संकेतस्थळावर जाहीर केले जात आहे आणि सर्व सलग्न महाविद्यालयांना आवश्यक व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पारंपारिक अभ्यासक्रमातील पदवीस्तर प्रथम वर्ष आणि विधी अभ्यासक्रम प्रथम वर्ष वगळून या अभ्यासक्रमांच्या उर्वरित वर्ष, पदवीधर स्तरावरील अभ्यासक्रमाची सर्व वर्षे, पदवी आणि पदवीत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमाचीं सर्व वर्षाची अनुरूप सत्र परीक्षा आयोजन विद्यापीठ स्तरावर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहणे अनिवार्य आहे. संबंधित महाविद्यालयांनी याबाबत विद्यार्थ्यांना पूर्वसूचना द्यावी असे विद्यापीठांनी स्पष्ट केले आहे.
परीक्षेच्या दृष्टिकोनातून महाविद्यालयात काटेकोर नियोजन करण्यात यावं त्याचबरोबर बैठक व्यवस्था सुयोग्य असावी. विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची आणि वस्तू ठेवण्याचीं व्यवस्था करावी अशी सूचना विद्यापीठाने महाविद्यालयांना दिल्या आहेत.