Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज सावधान! मोबाइल हॅक अन् खाते होईल रिकामे; पार्सल आलाय कॉल करा, असे...

सावधान! मोबाइल हॅक अन् खाते होईल रिकामे; पार्सल आलाय कॉल करा, असे सांगत होऊ शकते फसवणूक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : कुणी तुम्हाला फोन करून पोस्टाचे किंवा बँकेचे कुरिअर आले आहे. त्यासाठी कुरिअर बॉयला फोन करा, असे म्हणत मोबाइल क्रमांक पाठविला असेल तर सावधान! कारण संबंधित कुरिअर बॉयला फोन केलात तर तुमचा फोन हॅक झालाच म्हणून समजा. गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारचे मेसेज येण्याचे प्रमाण वाढले असून, सायबर पोलिसांकडे गेल्या दोन दिवसांत पाच ते सहा तक्रारी आल्या आहेत.

अचानक तुमच्या मित्र-मैत्रिणीच्या नावाने व्हॉट्सअॅपवर एक मेसेज येतो आणि तुमच्याकडे ४५ हजार रुपये पाठविण्याची विनंती केली जाते. या मेसेजला प्रतिसाद देऊन पैसे पाठवायचा विचार केलात तर फसाल! सायबर चोरट्यांनी तुमच्या मित्र-मैत्रिणींच्या व्हॉट्सअॅप क्रमांकाचा अॅक्सेस मिळवल्याने त्यांच्या संपर्क यादीतील सर्वांना एकाचवेळी असे मेसेज पाठविले जात आहेत. अशा प्रकारचे मेसेज ओळखीच्याच व्यक्तींकडून आल्याने सर्वजण धास्तावले आहेत.

आर्थिक फसवणुकीसाठी सायबर चोरटे दररोज नवनवीन फंडे शोधत आहेत. टास्क फ्रॉड आणि फेसबुक हॅक करून पैशाची मागणी करणाऱ्या मेसेजचा फंडा आजमावल्यानंतर आता पोस्ट किंवा बँकेचे कुरिअर आले आहे, असा फोन करून व्यक्तींच्या व्हॉट्सअॅपचा अॅक्सेस करून आर्थिक फसवणुकीची नवीन क्लृप्ती शोधली आहे.

जनसंपर्क व माध्यम क्षेत्रात कार्यरत दोन महिलांसह एकाच्या नावाने त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील व्यक्तींना मेसेज सुरू झाले. सायबर चोरट्यांनी त्यांचा मोबाइल हॅक केला आणि एका वेगळ्याच नावाने यूपीआय आयडी देऊन पैशाची मागणी केली. त्यांनी सायबर पोलिसांकडे रीतसर तक्रार नोंदविली आणि सोशल मीडियावरही या प्रकाराची माहिती देऊन सर्वांना अशाप्रकारचे मेसेज आल्यास सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

तुमचे एक कुरिअर आले आहे, असा फोन मला ऐन कामाच्या वेळेस आला. मग मी त्या व्यक्तीला घरी पाठवा असे म्हणाले. तो हिंदीमध्ये बोलत होता. एक माणूस कुरिअर द्यायला येणार आहे. त्याला तुम्ही फोन करा, असे सांगून त्याने मला मेसेज करून एक क्रमांक पाठवला. मी त्या नंबरवर कॉल केला; पण लागला नाही. त्याने *401# असे करून क्रमांक डायल करायला सांगितला आणि तसे केल्यानंतर त्या व्यक्तीचा फोन लागला; पण कुणीच बोलले नाही. माझे इनकमिंग कॉल्स बंद झाले. तोवर माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांना मेसेज गेले होते. आता माझं व्हॉट्सअॅप बंद झाले आहे. मी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. कुणाला माझ्या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून असे मेसेज आले असतील तर त्यांनी शेजारील तीन डॉटवर क्लिक करून रिपोर्ट करा.

तक्रारदार महिला

कुरिअर आल्याचा एक फोन येतो आणि *401# नि एक मोबाइल क्रमांक टाकायला सांगितला जातो. त्यामुळे तुमचे फोन आणि मेसेजेस त्या दिलेल्या क्रमांकावर फॉरवर्ड होतात. त्यानंतर तुमचे व्हॉट्सअॅप दुसरीकडे सायबर चोरटे अॅक्सेस करतात. अशा प्रकारे व्हॉट्सअॅप हॅक होत आहे. पैशाची मागणी करणारा ओळखीच्या क्रमांकावरून मेसेज आला तर तातडीने रिपोर्ट करा आणि क्रमांक ब्लॉक करा. दोन ते तीन दिवसांपासून अशा तक्रारी येण्यास सुरुवात झाली आहे.

त्यामुळे कुणीही सांगितले तरी *401# हा क्रमांक आणि त्यांनी सांगितलेला क्रमांक डायल करू नका.

– मीनल पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर

चॅटिंग करणारा निघाला सायबर चोरटा

काही व्यक्तींना व्हॉट्सअॅप क्रमांकावर पैशाची मागणी करणारे मेसेज आले. खातरजमा करण्यासाठी त्यांनी त्या क्रमांकावर चॅटिंग केले. आम्ही इतके पैसे पाठवू का? वगैरे विचारणा केली. त्या मेसेजला सायबर चोरटा चॅटिंगद्वारे प्रतिसाद देत होता, असेही सांगण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments