Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजसावधान ! तुम्हालाही असा फोन येऊ शकतो, पॉलिसी सेटलमेंट करून देण्याच्या नावाखाली...

सावधान ! तुम्हालाही असा फोन येऊ शकतो, पॉलिसी सेटलमेंट करून देण्याच्या नावाखाली सव्वासहा लाखांची फसवणूक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः पॉलिसी सेटलमेंट करून देण्याच्या बहाण्याने एका तरुणाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी ०९ जुलै रोजी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवणे परिसरात राहणाऱ्या एका ३७ वर्षीय युवकाने पोलिसांना फसवणुकीबाबत फिर्याद दिली आहे. एका अनोळखी आरोपी व्यक्तीने फिर्यादींना फोन करून एचडीएफसी बँकेतून मोहन पाठक नावाचा कर्मचारी बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादींच्या पॉलिसीबद्दल माहिती घेत पॉलिसी सेटलमेंट करण्यासाठी हा फोन केल्याचे त्याने सांगितले.

पॉलिसीची मूळ रक्कम १७ लाख ७२ हजार आणि बोनस रक्कम २ लाख ४६ हजार रुपये असून तुम्हाला ही रक्कम काढायची असल्यास आमच्या वरिष्ठांशी बोलावे लागेल, असे देखील फिर्यादींना सांगितले. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरून फोन केला आणि एक लिंक पाठवत त्यावर क्लिक करण्यास सांगितले. लिंकवर क्लिक झाल्यानंतर त्याद्वारे रिमोट ऍक्सेस मिळवून फिर्यादी यांच्या खात्यावर ६ लाख ९२ हजारांचे परस्पर लोन घेत फसवणूक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंदारे या प्रकरणाचा पुढील तपास हे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments