Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजसावत्र बापाने केला मुलीचा विनयभंग: 48 वर्षीय आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

सावत्र बापाने केला मुलीचा विनयभंग: 48 वर्षीय आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

अल्पवयीन मुलीला मारहाण करुन वारंवार तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर गर्भपात करण्यासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एका तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 17 वर्षीय पीडित मुलीने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून मयुर संजय केंद्रे (24, रा. खांदवेनगर, लोहगाव) याच्यावर बलात्कारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी 2023 ते फेब्रुवारी 2-024 या कालावधीत खराडी, वाघोली येथे घडला आहे. प्रकरण काय आहे?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने पीडित मुलीला वाघोली आणि खराडी येथे बोलवून घेतले. पीडित मुलगी त्याठिकाणी आली असता तिला एका महिलेच्या घरी घेऊन गेला. त्याठिकाणी तिला शिवागाळ करुन मारहाण केली. तसेच मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील तिच्यासोबत जबरदस्तीने वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला आणि तुझ्या आई-वडिलांना मारून टाकीन अशी धमकी आरोपीने दिली. दरम्यान, पीडित मुलगी चार महिन्याची गरोदर राहिली. आरोपीने हा प्रकार लपवण्यासाठी मुलीवर गर्भपात करण्यासाठी जबरदस्ती केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक खांडेकर करत आहेत.

  • सावत्र बापाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

वडगाव शेरी परिसरात राहणाऱ्या सावत्र बापाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी नराधम सावत्र बापावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

याबाबत 17 वर्षीय पीडित मुलीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून 48 वर्षीय सावत्र बापावर विनयभंगासह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. ही घटना पीडित मुलीच्या घरात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पीडित मुलाचा सावत्र बाप आहे. गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मुलगी अंघोळ करु किचनमध्ये कपडे बदल होती. त्यावेळी आरोपीने किचनचा दरवाजा वाजवून जेवण करायचे आहे सांगितले. मुलीने कपडे बदलल्यानंतर दरवाजाची कडी काढून दरवाजा उघडला. त्यावेळी आरोपीने किचनमध्ये येऊन पीडित मुलीला शिवीगाळ करुन तिच्यासोबत अश्लील वर्तन करुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. घाबरलेल्या मुलीने आरडाओरडा केला असता तिची आई व शेजारी घरात आले. आरोपीने मुलीला व तिच्या आईला शिवीगाळ करुन मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस नागवडे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments