Friday, April 19, 2024
Homeक्राईम न्यूजसायबर चोरट्याकडून डॉक्टर तरुणीची 28 हजारांची फसवणूकः सिंहगड ठाण्यात गुन्हा दाखल; दरोड्याच्या...

सायबर चोरट्याकडून डॉक्टर तरुणीची 28 हजारांची फसवणूकः सिंहगड ठाण्यात गुन्हा दाखल; दरोड्याच्या तयारीतील चोरट्यांची टोळी जेरबंद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बँक खात्यावर अधिकचे पैसे पाठवण्यात आले असून ते पैसे परत पाठवावयाला लावून काशीबाई नवले मेडिकल कॉलेज मधील एका डॉक्टर तरुणीची 28 हजारांची फसवणूक करण्यात आली आहे.

याप्रकरणी 26 वर्षीय डॉक्टर तरुणीने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिर्यादी यांना फोन करणारे मनोज, दीपांशु गौतम, रजंती यांच्यावर फसवणुकीसह आयटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी तरुणीला सायबर चोरटयांनी वडिलांच्या सांगण्यावरून ३० हजार पाठविल्याचे सांगून मोबाईलवर बनावट टेक्स मेसेज पाठविले. यानंतर बँक खात्यावर ३० हजार जास्त आले असल्याचे सांगून जास्तीचे पैसे परत करायला सांगून २८ हजार फोन पे करायला सांगून तरुणीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस कुंभार करत आहेत.

दरोड्याच्या तयारीतील चोरट्यांची टोळी जेरबंद

पुणे शहरातील मुंढवा परिसरात दरोड्याच्या तयारीतील चोरट्यांच्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. चोरट्यांकडून कोयते, मिरची पावडर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. श्रीकांत राजू जाधव (वय २१), करण हरिदास जाधव (वय १९), आनंद गोपी साळुंखे (वय १९), वीरेंद्र गणेश जड्डुल (वय २५, सर्व रा. मुंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो पसार झाला आहे. याबाबत गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पोलीस हवालदार अश्रुबा मोराळे यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. जाधव, साळुंखे, जड्डुल आणि साथीदार मुंढवा रेल्वे पुलाजवळ थांबले होते.

ते दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे सापळा लावून चौघांना पकडले. अंधारात त्यांच्याबरोबर असलेला साथीदार पसार झाला. चोरट्यांकडून कोयते, मिरची पावडर, नायलॉन दोरी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक एस महानोर पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments