Tuesday, September 10, 2024
Homeक्राईम न्यूजसादलगाव येथील भीमा नदी पात्रात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह...!

सादलगाव येथील भीमा नदी पात्रात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह…!

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

रांजणगाव गणपती: भीमा नदीत 30 ते 40 वर्षाच्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. यासंदर्भात पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मानसिंग माणिक होळकर (38 वर्ष) रा. सादलगाव ता. शिरूर जि. पुणे यांनी खबर दिली आहे.

मानसिंग होळकर हे भीमा नदीकाठी जुना कानगाव रोड, दिवेकर लिफ्ट येथे मोटर चालू करण्यासाठी गेले असता तेथे अनोळखी व्यक्ती पाण्यावर तरंगत असताना दिसून आला. पोलिसांनी सदरच्या अनोळखी व्यक्तीस ग्रामीण रुग्णालय शिरूर या ठिकाणी घेऊन गेले. त्यावेळी डॉक्टरांनी सदर इसम उपचारापूर्वीच मयत झाला असल्याचे सांगितले.

या घटनेचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नारायण गवळी करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments