Tuesday, February 27, 2024
Home क्राईम न्यूज सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी...

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

राजगुरुनगरः चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सुरेंद्र कैलास वर्मा (वय २२ रा. (कुरुळी) चाकण मुळगाव कंपू, ग्वाल्हेर, मध्यप्रदेश) असे शिक्षा झालेल्या नराधमाचे नाव आहे.

या खटल्याची माहिती अशी, दि ७ जुलै २०१५ रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजण्यापूर्वी चाकण (कुरुळी) येथे ही घटना घडली. पाहुण्यांकडे आलेल्या सुरेंद्र वर्मा या नराधमाने त्याच्या नातेवाईकाच्या शेजारी राहणाऱ्या एका सात वर्षीय मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून बिल्डिंगच्या टेरेसवर नेले. तेथे त्याने लहान सात वर्षे वयाच्या मुलीवर पाशवी अत्याचार केला. पीडित मुलगी सकाळीपासून घरी न परतल्याने तिच्या आईवडील व नातेवाईक शेजारी यांनी शोध घेतला. शोध घेत असताना टेरेसवर गेले असता सुरेंद्र वर्मा हा त्या लहान मुलीसोबत वाईट कृत्य करीत होता.

हा खटला राजगुरूनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायालयातील न्यायाधीश एस पी पोळ यांच्या पुढे सुरु होता. या खटल्यात आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली. १२ वर्षे सक्त मजुरी व १० हजार दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावासाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम रुपये २० हजार पीडित मुलीचा देण्याचा आदेश कोर्टाने दिला. या खटल्याचे न्यायालयीन पोलीस कामकाज योगिता गावडे यांनी केले.

RELATED ARTICLES

ईडी, सीबीआयचा वापर करून लोकशाहीवर घावः शरद पवार यांची महायुतीवर जोरदार टीका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या 'मोदी गॅरंटी' अशी जाहिरात करत आहेत. मात्र, त्यामधील एकही आश्वासन त्यांनी प्रत्यक्षात पूर्ण केलेले...

तिघांविरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलः बांधकाम सुरू असलेल्या गृहप्रकल्पाच्या सहाव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्देवी मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) बांधकाम सुरू असलेल्या एका गृहप्रकल्पात काम करणारा मजूर सहाव्या मजल्यावरून पडून दुर्देवीरीत्या मयत झाल्याची घटना मुंढवा भागात घडली. मजुराच्या...

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले: जे काम बंदुकीची गोळी करू शकत नाही ते काम अमली पदार्थ करतात; पुणे पोलिसांची कारवाई अभिमानास्पद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई केली असून ती अभिमानास्पद आहे. नजीकच्या काळातील देशातील ही सर्वात मोठी कारवाई...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

ईडी, सीबीआयचा वापर करून लोकशाहीवर घावः शरद पवार यांची महायुतीवर जोरदार टीका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या 'मोदी गॅरंटी' अशी जाहिरात करत आहेत. मात्र, त्यामधील एकही आश्वासन त्यांनी प्रत्यक्षात पूर्ण केलेले...

तिघांविरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलः बांधकाम सुरू असलेल्या गृहप्रकल्पाच्या सहाव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्देवी मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) बांधकाम सुरू असलेल्या एका गृहप्रकल्पात काम करणारा मजूर सहाव्या मजल्यावरून पडून दुर्देवीरीत्या मयत झाल्याची घटना मुंढवा भागात घडली. मजुराच्या...

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले: जे काम बंदुकीची गोळी करू शकत नाही ते काम अमली पदार्थ करतात; पुणे पोलिसांची कारवाई अभिमानास्पद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई केली असून ती अभिमानास्पद आहे. नजीकच्या काळातील देशातील ही सर्वात मोठी कारवाई...

फायनान्सची वसुली करणाऱ्यांकडून रिक्षा चालकाला मारहाणः भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) फायनान्सचे बाऊन्सिंग चार्जेस भरले नसल्याने फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्यांनी रिक्षा ताब्यात मागितली. त्यावेळी रिक्षा देण्यास नकार दिल्याने तिघांनी रिक्षा...

Recent Comments