Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज सात महिन्यांच्या अथक तपासानंतर सायबर फ्रॉडच्या मास्टरमाइंडला ठोकल्या बेड्या

सात महिन्यांच्या अथक तपासानंतर सायबर फ्रॉडच्या मास्टरमाइंडला ठोकल्या बेड्या

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई | 16 ऑक्टोबर 2023 : सामान्य, निष्पाप नागरिकांशी गोड बोलून त्यांची फसवणूक करणाऱ्या भामट्यांची संख्या वाढली आहे. अशीच एका सायबर फ्रॉडची घटना उघडकीस आली होती. त्याप्रकरणातील आरोपीला अटक करण्यात पोलिसांना अखेर यश मिळाले आहे. सतत सात महिने पाठपुरावा केल्यानंतर सायबर फ्रॉड (cyber fraud) प्रकरणातील संशयिताला अटक केली आहे. या काळात आरोपी फरार होता.

एका खाजगी कंपनीत नोकरी करणाऱ्या आणि अंधेरी पश्चिम येथे राहणाऱ्या २९ वर्षीय पीडित इसमाची आरोपीने ६०,००० रुपयांची फसवणूक केली होती. आपण बजाज फायनान्स कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवत आरोपीने ऑनलाइन पॉलिसी आणि कर्जाच्या ऑफरच्या नावाखाली तक्रारदाराची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. किरण माने (३२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव • आहे. मात्र, त्याचा दुसरा साथीदार अद्याप फरार असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.

खोटा दावा करून केली फसवणूक

फेब्रुवारी 2023 मध्ये, पीडित इसमाला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. आपण बजाज फायनान्स कंपनीचे प्रतिनिधीत्व करत असल्याचा खोटा दावा कॉलरने केला. खोटं बोलणाऱ्या त्या तोतयाने पीडित इसमाला कर्जाची ऑफर दिली आणि काही इन्श्युरन्स पॉलिसींची शिफारसही केली. पॉलिसी मिळाल्यास कर्ज मंजूरीची हमी मिळेल, असे आश्वसन पीडित इसमाला देण्यात आले. त्यानंतर त्याला एका विशिष्ट बँक खात्यात निधी ट्रान्स्फर करण्याची सूचनाही देण्यात आली. पीडित इसमाने या

सूचनांचे पालन करत पैसे पाठवले.

मात्र काही दिवसांनी त्या कॉलरने पीडत इसमाला पुन्हा फोन केला आणि तुमची आई सीनिअर कॅटॅगरीत येत असल्याने अतिरिक्त पॉलिसी खरेदी करावे लागेल असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून पीडित इसमाने 60 हजार रुपये त्याला ट्रान्स्फर केले.

कर्जाच्या रकमेबाबत जे वचन दिले होते, त्याबद्दल शंका निर्मा झाल्यानंतर पीडित इसमाने त्या कॉलरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने टाळाटाळ करत असंबंद्ध उत्तरे देण्यास सुरूवात केली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे पीडित इसमाच्या लक्षात आले आणि त्याने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी अंधेरी पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्यानंतर अंधेरी पोलिसांकडून सतत सात महिने गुन्हेगाराचा शोध घेण्यात आला. अखेर त्याला अटक करण्यात यश मिळाले. पण दुसरा साथीदार अद्यापही फरार आहे.

RELATED ARTICLES

शिरूर तालुक्यातील निर्वी येथे अपघातात साठ वर्षीय महिलेचा मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) न्हावरे : निर्वी (ता. शिरूर) गावाच्या हद्दीत निर्वी - कोळगाव डोळस रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोने दुचाकीला धडक देऊन झालेल्या...

पुणे महापालिकेची कारवाई; रस्ते, पदपथ ठिकठिकाणी आढळणारी १३९ बेवारस वाहने जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : महापालिकेच्या हद्दीत रस्ते, पदपथावर ठिकठिकाणी आढळणाऱ्या बंद अथवा बेवारस अवस्थेतील वाहनांविरोधात महापालिका कारवाई करत आहेत. सुरुवातीला या...

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) राजगुरुनगरः चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

शिरूर तालुक्यातील निर्वी येथे अपघातात साठ वर्षीय महिलेचा मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) न्हावरे : निर्वी (ता. शिरूर) गावाच्या हद्दीत निर्वी - कोळगाव डोळस रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोने दुचाकीला धडक देऊन झालेल्या...

पुणे महापालिकेची कारवाई; रस्ते, पदपथ ठिकठिकाणी आढळणारी १३९ बेवारस वाहने जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : महापालिकेच्या हद्दीत रस्ते, पदपथावर ठिकठिकाणी आढळणाऱ्या बंद अथवा बेवारस अवस्थेतील वाहनांविरोधात महापालिका कारवाई करत आहेत. सुरुवातीला या...

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) राजगुरुनगरः चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२...

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा; पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील सर्व आस्थापनांच्या पाट्या देवनागरी लिपीत...

Recent Comments