Thursday, July 3, 2025
Homeक्राईम न्यूजसाचापीर स्ट्रीटमध्ये भीषण दुर्घटना..! चौथ्या मजल्यावरून स्लॅब कोसळला; एक कामगार ठार, दोन...

साचापीर स्ट्रीटमध्ये भीषण दुर्घटना..! चौथ्या मजल्यावरून स्लॅब कोसळला; एक कामगार ठार, दोन जखमी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः कॅम्प परिसरातील साचापीर स्ट्रीटवरील जुन्या ओयसिस हॉटेल शेजारी असलेल्या बिल्डिंग क्रमांक ४९५/४९६ मध्ये सुरु असलेल्या इमारतीच्या बांधकाम स्थळी मंगळवारी दुपारी भीषण दुर्घटना घडली. चौथ्या मजल्यावरून जिन्यावरील स्लॅब अचानक कोसळल्याने एक तरुण कामगार जागीच ठार झाला असून, इतर दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

ही दुर्घटना मंगळवारी दुपारी सुमारे १२.३० च्या सुमारास घडली. स्थानिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कामगार चौथ्या मजल्यावर जिन्याचे काम करत असताना अचानक स्लॅब कोसळला. यात तीन कामगार खाली कोसळले. त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोन कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

घटनेची माहिती मिळताच पुणे कॅन्टोन्मेंट पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्य सुरू करण्यात आले. याप्रकरणी संबंधित बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदार यांची चौकशी सुरू असून, बांधकामात निष्काळजीपणा झाला का? याचा तपास पोलिस करीत आहेत.

ही घटना नेमकी कशामुळे घडली? बांधकाम क्षेत्रातील सुरक्षा उपायांची अंमलबजावणी होत होती का? या प्रश्नांवर आता प्रशासकीय आणि पोलिस पातळीवरून चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दुर्घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांनी बांधकामावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments