Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजसाऊंड बॉक्सचा कारखाना, गोदाम भस्मसातः पुण्यातील येरवड्यातील घटना, अग्निशमन दलाकडून आगीवर...

साऊंड बॉक्सचा कारखाना, गोदाम भस्मसातः पुण्यातील येरवड्यातील घटना, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

येरवड्यातील विडी कामगार वसाहत येथे कारखाना आणि गोडाऊनला आग लागल्याची घटना शनिवारी घडली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याच्या मारा करत आग आटोक्यात आणली.

येरवड्यात विडी कामगार वसाहत येथे दोन मजली बिल्डिंग मध्ये साऊंड बॉक्सचा कारखाना आणि गोडावून आहे. गोडावूनला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर येरवडा, धानोरी, नायडू व मुख्यालयातून दोन वॉटर टँकर आणि बंब घटनास्थळी दाखल झाली.

तळमजला अधिक एक मजला असलेल्या इमारतीत तळमजल्यावर असलेल्या पञ्याच्या शेडमध्ये साऊंड बॉक्स बनविण्याच्या कारखान्यात मोठ्या प्रमाणात आग लागली होती तसेच शेजारीच असलेल्या गोडाऊनमध्ये ही आग लागल्याचे अग्निशामक दलाच्या जवानांच्या लक्षात आले. जवानांनी तातडीने कारखान्यात आत कोणी अडकले आहे का याची माहिती घेतली असता एक कामगार सुखरुप बाहेर पडल्याचे समजले. त्यानंतर अग्निशामक दलाच्या वतीने आगीवर पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली व कुलिंग केले. आग इतरत्र कोठे ही पसरु नये याची खबरदारी घेतल्याने पुढील धोका टळला. कारखान्याच्या बाजूला असलेल्या गॅरेज मधील तीन दुचाकींना आगीची झळ बसल्याने नुकसान झाले. शेजारीच असलेल्या इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरला ही आगीची झळ बसली होती. घटनास्थळी खाजगी वॉटर टँकर व जेसीबीची मदत घेण्यात आली होती. आगीमध्ये कोणी ही जखमी नसून यामध्ये इलेक्ट्रिक साहित्य, मशीनरी, लाकडी सामान असे साहित्य पुर्ण जळाले. आगीचे कारण समजू शकले नाही.

ही कामगिरीत अग्निशमन अधिकारी विजय भिलारे, सुभाष जाधव, सोपान पवार तसेच तीस-चाळीस जवानांनी आग आटोक्यात आणली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments