Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजसांगलीतील ड्रग्ज साठ्यातून सुरू होता गोव्यामध्ये पुरवठाः रॅकेटच्या मास्टरमाइंडविरुद्ध रेड कॉर्नर ...

सांगलीतील ड्रग्ज साठ्यातून सुरू होता गोव्यामध्ये पुरवठाः रॅकेटच्या मास्टरमाइंडविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थाचे रॅकेट पुणे पोलिसांनी नुकतेच उघडकीस आणले. यातील टोळी सांगली येथील साठ्यातून गोव्यामध्येही ड्रग्ज पुरवठा करत होती, अशी माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील अटक आरोपी हैदर नूर शेख (रा. पुणे) याने पुणे शहर, महाराष्ट्रात तसेच इतर राज्यांत एमडीचा मोठ्या प्रमाणात साठा केल्याचे तपासात निष्पन्न झाले. सांगली येथून जप्त करण्यात आलेल्या एमडी साठ्यातील काही माल गोव्यात तसेच इतर ठिकाणी विक्री करण्यात आला आहे. या टोळीचा मास्टरमाइंड सॅम ऊर्फ संदीप धुनिया आहे. तो इंग्लंडचा रहिवासी असून तो सध्या कुवेतमध्ये आहे. हवालामार्फत त्याने पैशाचे व्यवहार केल्याचा संशय पोलिसांना आहे. धुनियाच्या विरोधात पोलिसांनी रेड कॉर्नर नोटीस काढली आहे. त्याच्याविरोधात यापूर्वी डीआरआयने ३०० कोटी रुपयांच्या ड्रग्ज तस्करीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, हैदर शेख याच्यासह आरोपी वैभव माने (४०, रा. पुणे), अजय करोसिया (३५, रा. पुणे) व आयुब अकबरशहा मकानदार (४८, रा. कुपवाड, सांगली) या आरोपींना तपास अधिकारी राजेंद्र लांडगे यांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले तेव्हा त्यांच्या पोलिस कोठडीत दोन मार्चपर्यंत वाढ करण्याचे आदेश देण्यात आले. या गुन्ह्यात हैदर शेखचा एक फरार साथीदार अली शेख त्याला सांगली येथे एमडी पुरवत होता. अटकेतील आरोपींनी कोणाच्या सांगण्यावरून अमली पदार्थाचा साठा केला. त्यांना आर्थिक मदत कोणी केली. तसेच सॅम, ब्राऊन व्यक्तीसह आणखी सात आरोपींना शोध घेणे बाकी आहे, असे सरकारी वकील अॅड. वर्षा असलेकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

पाच वर्षांची शिक्षा भोगून आल्यावर पुन्हा तोच धंदा

सरकारी वकील वर्षा असलेकर यांनी न्यायालयात सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून गोदाम व कंपनीतून एमडी अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आला आहे. एकूण एक हजार ६३९ कोटी १८ लाख २८ हजार ९०० किमतीचा ८६७ किलो ५४८ ग्रॅम एमडी अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. त्यापैकी २९७ कोटी ४९ लाख ६० हजार रुपये किमतीचा ७४८ ग्रॅम एमडी अमली पदार्थ सांगलीतून आरोपी आयुब मकानदार याच्या ताब्यातून जप्त करण्यात आला आहे. तो सन २०१५ मधील अमली पदार्थाच्या गुन्ह्यातील आरोपी असून त्याने कारागृहात पाच वर्षांची शिक्षाही भोगलेली आहे. तुरुंगातून बाहेर पडल्यावर पुन्हा त्याने ड्रग्ज तस्करीचा धंदा सुरू केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments