Wednesday, November 29, 2023
Home क्राईम न्यूज ससूनमध्ये राहण्यासाठी दररोज 70,000; ड्रग माफिया ललित पाटीलचा पाहुणचार

ससूनमध्ये राहण्यासाठी दररोज 70,000; ड्रग माफिया ललित पाटीलचा पाहुणचार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : ससून रुग्णालयात राहून ड्रग रॅकेट चालवणारा ललित पाटील ससूनमध्ये राहण्यासाठी रुग्णालयातील अतिवरिष्ठांना प्रतिदिन ७० हजार रुपये देत असल्याची माहिती ससूनमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्याचे पेमेंट कॅशमध्ये आणि आठवड्याची रक्कम एकदाच घेतली जात होती आणि त्याचे कलेक्शन ससून रुग्णालयातील अतिवरिष्ठांचा ‘खास’ असलेल्या क्लास-फोरकडून केले जात असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता संजीव ठाकूर हे न्यायालयाच्या तारखेनिमित्त मुंबईला असल्याने संपर्क होऊ शकला नाही.

तीन वर्षांपूर्वी अटकेत असलेला ललित पाटील १६ महिन्यांपासून ससूनमध्ये पाहुणचार घेत आहे. ड्रग रॅकेट सापडले अन् तो सहीसलामत पळालादेखील. ससूनमधील १६ नंबरच्या कैद्यांच्या वॉर्डमध्ये त्याची खास बडदास्त ठेवली जात होती. येथे त्याच्याकडे सव्वादोन लाखांचे आयफोन होते.

१६ महिने ससूनचा पाहुणा

ललित तीन वर्षांपूर्वी जून २०२० मध्ये अटक झालेला आहे. तेव्हापासून त्याची येरवडा कारागृहात रवानगी केलेली आहे. याला ३९ महिने झाले आहेत. त्यांपैकी त्याने जवळपास १६ महिने ससूनमध्येच मुक्काम झोडला.

‘क्लास फोर’चा कर्मचारी मध्यस्थ?

ससून रुग्णालयात अतिवरिष्ठांचे ‘अर्थ’कारण सांभाळणारा क्लास फोरचा कर्मचारी यामध्ये मध्यस्थ आहे. हा कर्मचारी ससून रुग्णालयात महागडी फोर व्हीलर घेऊन येतो. त्याच्या अनेक प्रॉपर्टीज आहेत.

विश्वसनीय सूत्रांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार ललित हा रुग्णालयातूनच मेफेड्रॉन ड्रगची तस्करी करत होता. त्यातून तो कोट्यवधींचा व्यवहार करीत होता. १६ नंबर वॉर्डमध्ये उपचारांसाठी राहू देण्यासाठी व सर्व काही बडदास्त ठेवण्यासाठी तो दिवसाला ७० हजार रुपये रोख मोजत होता. सात दिवसांचे पैसे अॅडव्हान्समध्ये घेतले जात होते..

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments