इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये डॉक्टरच्या चारचाकी वाहनाने रिक्षा आणि दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात तिघे जण किरकोळ जखमी झाले असून एक जण गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघात झाल्यानंतर स्वतः वाहनचालक डॉक्टरने जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलीस वायसीएम रुग्णालयात दाखल झाले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभ नगर बस स्थानकाच्या जवळ चारचाकी वाहनाने रिक्षा, दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातातील कार चालक हा ससूनचा डॉक्टर असल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. या डॉक्टरने भरधाव वेगात तिघांना उडवले, तर एका टपरीला ही जोराची धडक दिली. एक व्यक्ती तर चाकाखाली अडकली होती.
जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाहन चालक डॉक्टरला कोणतीही जखम झालेली नसून तीन जण किरकोळ जखमी असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. स्वतः ज्या व्यक्तींने अपघात केला त्याने जखमींना रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेल्या कारने मागून रिक्षाला घडक दिली. त्यानंतर गाडीने एका टपरीला धडक दिली. गाडीच्या चाकाखाली एका व्यक्तीचे डोके देखील आले होते. मात्र, आसपासच्या लोकांनी लगेच गाडी हलवली त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही.