Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज सव्वा कोटींना गंडवणाऱ्या आरोपीचा जामीन रद्द

सव्वा कोटींना गंडवणाऱ्या आरोपीचा जामीन रद्द

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : ओएनजीसी कंपनीचे कंत्राट मिळवून देतो, असे सांगून १ कोटी २७ लाख ५० हजार रुपयांची पुण्यातील व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणात गुजरात बडोदा येथील व्यक्तीला कनिष्ठ न्यायालयाने मंजूर केलेला जामीन सत्र न्यायालयाने रद्द केला. सत्र न्यायाधीश व्ही.डी. निंबाळकर यांनी हा आदेश दिला आहे.

धर्मेश प्रफुलचंद्र शहा याचा जामीन रद्द करण्यात आला आहे. पुणे येथील व्यावसायिक विक्रम रघुनाथ नलावडे (रा. औंध) यांची डिसेंबर 2019 ते डिसेंबर 2022 या दरम्यान १ कोटी २७ लाख ५० हजार रुपयांची ही रक्कम घेऊन फसवणूक करण्यात आली होती. नलावडे यांनी याबाबत डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती, त्यानुसार गुन्हा दाखल आहे. शहा याला या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. हा जामीन रद्द करण्यासाठी फिर्यादी नलावडे यांनी अॅड. हेमंत झंजाड यांच्या मार्फत सत्र न्यायालयात अर्ज केला होता. झंजाड यांना अॅड. राहुल खरे, अॅड. अनिल हुडे, अॅड. साईराज शिरसाट यांनी सहकार्य केले.

अॅड. झंजाड यानी युक्तिवाद केला की, कनिष्ठ न्यायालयामध्ये आरोपीने बनावट कागदपत्र तयार करून ते खरे आहेत, असे भासवून न्यायालयाची दिशाभूल करून जामीन मंजूर करून घेतला आहे. तसेच, आरोपी हा सराईत गुन्हेगार असून देशातील अनेक राज्यात त्याने अनेक लोकांना ओएनजीसी कंपनीचे कंत्राट मिळवून देतो असे सांगून कोट्यावधी रुपयांना फसवलेले आहे. तसेच, तो फिर्यादीला पैसे द्यायला तयार आहे व त्या आधारे जामीन मिळवला होता. परंतु त्यांनी पैसेही दिले नाहीत, त्यामुळे जामीन रद्द करणाची मागणी करण्यात आली. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने जामीन रद्द केला. तसेच, न्यायालयात शरण येण्यास सांगितले आहे.

 

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments