Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजसलमान खान गोळीबार प्रकरणः पुण्यात आर्म ऍक्टचे गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारांची पोलिसांकडून...

सलमान खान गोळीबार प्रकरणः पुण्यात आर्म ऍक्टचे गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारांची पोलिसांकडून परेड

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

अभिनेता सलमान खान याच्या मुंबईतील घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेच्या पार्शवभूमीवर पुण्यात आर्म ऍक्टचे गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारांची परेड घेण्यात आली. तसेच शहरात गोळीबाराच्या घटना झाल्या पाहिजे अशी सक्त ताकीद यावेळी देण्यात आली आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाने गुन्हेगारांची शाळा भरवण्यात आली होती. यापूर्वी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सराइत गुन्हेगार, अंमली पदार्थ विक्रेते यांना अशाच प्रकारे बोलावून तंबी दिली होती.

रविवारी अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. या पार्शवभूमीवर शहरात मागच्या 5 वर्षात आर्म ऍक्ट नुसार शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या 614 गुन्हेगारांपैकी 150 ते 200 जणांना पोलिस आयुक्तलयात बोलावण्यात आले होते. यावेळी शहरात गोळीबाराचा घटना घडल्या नाही पाहिजे अशी सक्त ताकीद यावेळी देण्यात आली. तसेच यावेळी या गुन्हेगारांकडून डोजिअर फॉर्म देखील भरून घेण्यात आला आहे.

पोलिस आयुक्तालयात बोलावण्यात आलेल्या आर्म ऍक्टच्या गुन्हेगारांच्या घरांची झाडाझडती सुद्धा घेण्यात आली. मात्र पोलिसांना काही आढळून आले नाही. यावेळी या गुन्हेगारांना सूचना देण्यात आल्या की, शहरात कुठेही गोळीबाराची घटना झाली नाही पाहिजे. याच बरोबर जर कोणी बेकादेशीरपणे पिस्टल घेऊन फिरत असेल तर त्याची ‘टिप’ पोलिसांना द्यावी. तुमचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे सांगण्यात आले. आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल असणाऱ्या गुन्हेगारावर लक्ष ठेवण्याच्या सूचना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेला दिल्या आहेत.

अभिनेता सलमान खानच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबाराच्या घटनेच्या पार्शवभूमीवर पुण्यातील आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल असणाऱ्या गुन्हेगारांना आयुक्तालयात बोलावून सक्त ताकीद देण्यात आली आहे. जर कोणी बेकादेशीरपणे पिस्टल घेऊन फिरत असेल किंवा कोणाकडे पिस्टल असल्यास त्यांची माहिती पोलिसांना द्यावी त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments