Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज सलग तिसऱ्या दिवशी पुण्यात खून, वडिलांकडून अल्पवयीन मुलीची कुऱ्हाडीने हत्या

सलग तिसऱ्या दिवशी पुण्यात खून, वडिलांकडून अल्पवयीन मुलीची कुऱ्हाडीने हत्या

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी खुनाची घटना घडली आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाघोली परिसरात वडिलांनीच मुलीचा अतिशय निर्घृणपणे खून केलाय. बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. अक्षदा फकीरा दुपारगुडे (वय १५, सध्या राहणार वाघोली, मूळ सोलापूर) असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे.

स्वतः बापानेच कुऱ्हाडीने वार करत अक्षदाला संपवलं. कुऱ्हाडीने डोक्यात, हातावर, पायावर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अक्षदाला रुग्णालयात नेत असताना तिचा वाटेतच मृत्यू झाल्याची माहिती लोणीकंद पोलिसांनी दिली. अक्षदावर कुऱ्हाडीने वार केल्यानंतर आरोपी मात्र घटनास्थळावरून पसार झाला. दरम्यान माहिती मिळाल्यानंतर लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलीच्या मावशीच्या पतीच्या फिर्यादीवरून लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस अधिक तपास करत आहे.

 

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments