Thursday, June 13, 2024
Homeक्राईम न्यूजसर्वात मोठी बातमी : हिट अँड रन प्रकरणी वेदांत अग्रवालची बाल...

सर्वात मोठी बातमी : हिट अँड रन प्रकरणी वेदांत अग्रवालची बाल सुधारण गृहात होणार रवानगी; बाल हक्क न्यायालयाचा निर्णय

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुणे हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल याला बाल सुधारण गृहात ठेवण्यात येणार आहे, असा निर्णय बाल हक्क न्यायालयाने दिला आहे. दरम्यान, बाल हक्क न्यायालयाने आधीचा निर्णय रद्द केला असून वेदांतला मिळालेला जामीन रद्द करण्यात आला आहे. त्याला आता बाल सुधारण गृहात ठेवण्यात येणार आहे, असा मोठा निर्णय बाल हक्क न्यायालयाने घेतला आहे.

कल्याणीनगर परिसरात भरधाव वेगात आलिशान पोर्शे कार चालवून दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्यानं अल्पवयीन आरोपीला आज पुण्यातील बाल हक्क मंडळात हजर करण्यात आले होते. आज दुपारी 12 वाजल्यापासून बाल हक्क न्यायालयात सुनावणी सुरु होती. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर न्यायालयाने संध्याकाळी उशिरा निकाल जाहीर केला.

या निकालात आरोपी वेदांत अग्रवाल याला याआधी अल्पवयीन असल्यामुळे देण्यात आलेला जामीन रद्द करण्यात आल्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच पोलीस तपासानंतर तो सज्ञान आहे की अज्ञान आहे, ते ठरवले जाणार असून आता त्याला बाल सुधारगृहात ठेवण्यात येणार आहे. या प्रकरणाचा संपुर्ण तपास होईपर्यंत आरोपीला बाल सुधारगृहात ठेवण्यात येणार असून तपास पुर्ण झाल्यानंतर तो सज्ञान आहे, की अज्ञान ते ठरवले जाणार आहे. तोपर्यंत आरोपी वेदांतला १४ दिवसांसाठी बालसुधारगृहात ठेवण्यात येणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

आरोपी वेदांतचे वकील प्रशांत पाटील यांनी आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला देण्यात आलेला जामीन योग्यचं आहे, असा युक्तिवाद केला होता. मात्र, पोलिसांनी आपली बाजू मांडताना सविस्तर युक्तिवाद केला. आरोपी वेदांत अग्रवाल हा नशेच्या आहारी गेला होता. त्यामुळे त्याच्या जामीनाच्या निर्णयावर पुनर्विचार करावा. जामीन रद्द करुन त्याला निरीक्षणगृहात ठेवावे, असा युक्तिवाद पोलिसांकडून करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments