इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थेत पोर्श कार चालवून दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पोर्श कार भरधाव वेगात चालवून अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडले होते.
दरम्यान, या अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची पुण्यातील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली होती. आता या अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. अल्पवयीन आरोपीच्या आत्याने कोर्टात याचिका दाखल केली होती. ही आटक बेकायदा असल्याचे याचिकाकर्त्याचं म्हणणं होतं.
पुण्यातल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा हा अल्पवयीन मुलगा आहे. त्याने नशेत कल्याणीनगर येथे 19 मे ला पहाटे दोन मोटारसायकल स्वार सॉफ्टवेअर अभियंत्यांना आपल्या पोर्शे कारने धडक दिली होती. यामध्ये दोन्ही अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. अपघात झाल्यानंतर या अल्पवीयन मुलाला अटक करून त्याला कोर्टात हजर करण्यात आलं होतं.
त्यावेळी कोर्टाने त्याला अपघातावर तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगून जामीन मंजूर केला होता. त्यानंतर पुण्यासह सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर या अल्पवयीन मुलाची बालसुधार गृहात रवानगी केली होती. त्यानंतर आज त्याला कोर्टाने जमीन मंजूर केला आहे.
पुणे पोलिसांना झटका
दरम्यान, पुण्यातील कल्याणीनगर भागातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर झाल्याने पुणे पोलिसांना मोठा झटका बसला आहे. त्याचबरोबर पोलिसांनी तपासामध्ये ढिसाळपणा केल्याचे आरोप आता त्यांच्यावर होताना दिसत आहेत.