Friday, June 14, 2024
Homeक्राईम न्यूजसर्वात मोठी बातमी : अजित पवारांना धक्का; सुप्रिया सुळे एक लाखाहून अधिक...

सर्वात मोठी बातमी : अजित पवारांना धक्का; सुप्रिया सुळे एक लाखाहून अधिक मतांनी विजयी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदार संघामध्ये अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे विजयी झाल्या आहेत. एक लाखाहून अधिक मताधिक्याने सुळे यांनी विजय मिळवला आहे.

बारामतीकरांनी शरद पवार यांच्या मुलीला म्हणजेच सुप्रिया सुळेंना पसंती दिली आहे, तर सुनेला म्हणजे सुनेत्रा पवारांना नाकारलं आहे. राज्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेची लढाई ही सुप्रिया सुळेंनी जिंकली आहे. त्यामुळे बारामतीच्या अतितटीच्या लढाईत काकांनी पुतण्याला धोबीपछाड देत आपणच बारामतीचे साहेब असल्याचं सिद्ध केलं.

मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीपासूनच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार याच्यामध्ये चढाओढ सुरू असल्याचे दिसून आले. पण शेवटच्या टप्प्यात सुप्रिया सुळे यांनी निर्णायक आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे गेल्या 60 वर्षांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या शरद पवारांनी आपल्या लेकीला निवडून आणत बारामती आपलीच आहे हा संदेश दिला आहे.

दरम्यान, बारामतीमध्ये शरद पवारांना घेरण्याची एकही संधी भाजपने सोडली नाही. जे जे नेते अजित पवारांच्या विरोधात होते, त्या नेत्यांना भाजपने आपल्याकडे वळवून घेत सुनेत्रा पवारांच्या प्रचारात सक्रिय केले. हर्षवर्धन पाटील आणि विजय शिवतारेंनी सुनेत्रा पवारांचा प्रचार केला. त्याचवेळी स्थानिक पातळीवरील अनेक नेत्यांना अजित पवारांनी साम, दाम, दंड, भेद नितीने आपल्या बाजूने वळवून घेतले.

तर दुसऱ्या बाजूला शरद पवार बारामतीमध्ये सक्रिय होऊन जुन्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या. त्यामध्ये त्यांनी अनंतराव थोपटे आणि चंद्रराव तावरे यांची भेट घेऊन राजकीय बेरीज केली. तसेच गावागावातल्या अनेक स्थानिक संस्थांच्या पदाधिकांच्या भेटी देखील शरद पवार यांनी घेतल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments