Wednesday, November 29, 2023
Home क्राईम न्यूज सर्वात मोठा दरोडा, २० तास दरोडेखोर काहीही न खाता, किलो-किलोने सोनं लुटत...

सर्वात मोठा दरोडा, २० तास दरोडेखोर काहीही न खाता, किलो-किलोने सोनं लुटत होता, पाहा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नवी दिल्ली | 30 सप्टेंबर 2023 : राजधानी दिल्लीतील उमराव सिंह या नामवंत ज्वेलर्सच्या शोरूममध्ये रविवारी ( robbery at jewellery showroom) झालेल्या मोठ्या चोरीने शहरच हादरलं. २५ कोटींचा माल चोरी करणाऱ्या आरोपींना अखेर पोलिसांनी बेड्या (accused arrested) ठोकल्या. मात्र या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असलेला आरोपी लोकेश हा एक सराईत गुन्हेगार आहे. या ज्वेलर्सच्या शोरूममध्ये दरोडा टाकला त्यावेळी तो 20 तास उपाशी होता. निजामुद्दीनच्या जंगपुरा येथील उमराव सिंग ज्वेलरी शोरूममध्ये असताना 20 तास तो केवळ कोल्डड्रिंक पीत होता. बाकी काहीच न खाता तो सोन, चांदी, हिऱ्याचे दागिने, हा लुटीचा माल भरत होता. त्याला महागड्या कार्सचा शौक आहे. पोलिसांनी त्याच्याकडून थार कारही जप्त केली.

दिल्ली पोलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलगंणामध्ये केलेल्या एका गुन्ह्यात त्याने 40 किलो सोनं लुबाडलं तेव्हा त्या इमारतीमध्ये संपूर्ण 24 तास उपाशी राहिला. अगदी आरामात, वेळ घेऊन अनेक तास तो गुन्ह्याची, लुटीची घटना पार पाडतो. लुटीननंतर घटनास्थळी तो एकही दुवा किंवा पुरावा मागे सोडत नाही

दिल्लीतील या चोरी दरम्यानही रविवारी २४ सप्टेंबर रोजी सकाळी तो शोरूमची रेकी करायला गेला अनेक तास तो तिथेच होता. नंतर तिथून तो गायब झाला. लुटीपूर्वी रात्री तो शोरूमच्या बाहेर कोणाशी तरी बोलत होता, त्यानंतरच तो आत घुसला.

सगळ्यात पहिले तोडले सीसीटीव्ही कॅमेरे

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरी करण्यासाठी लोकेश शोरूममध्ये घुसला आणि सर्वात पहिले त्याने तेथील सगळे सीसीटीव्ही कॅमेरे तोडले. त्यानंतर त्याने स्ट्रॉंग रूम तोडून आत प्रवेश केला. रात्री साधारण 11.45 च्या सुमारास तो आत घुसला असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

त्यानंतर थेट दुसऱ्या दिवशी सोमवारी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास तो शोरूमच्या बाहेर पडला. त्या संपूर्ण घटनेदरम्यान त्यानेच काहीच खाल्लं नाही. शोरूममध्ये असलेल्या फ्रीजमधले कोल्डड्रिंक पिऊन त्याने सगळा दिवस काढला.

घटनाक्रम

रविवार, 24 सप्टेंबर :

सकाळी 9.30 वाजता : रेकी साठी जंगपुरा येथील शोरूम गाठले, रात्री 11.45 वाजता : शोरूममध्ये प्रवेश केला, आत शिरताच त्याचा फोटो कॅप्चर झाला.

सोमवार, 25 सप्टेंबर :

संध्याकाळी 7.30 वाजता चोरी करून दागिने घेऊन शोरूममधून बाहेर पडला. ऑटोने काश्मिरी गेटला पोहोचला. नंतर रात्री 9.15 वाजता तो काश्मिरी गेटच्या बस स्थानकावर होता. तेथून त्याने छत्तीसगड साठी व्हॉल्व्हो पकडली. रात्री 10.40 च्या सुमारास त्याचे लोकेशन जेवरजवळ एक्स्प्रेस वेवर इथे दिसले, मात्र तिकडे त्याने त्याचा मोबाईल स्विच ऑफ केला.

मंगळवार, 26 सप्टेंबर :

सकाळी मध्य प्रदेशामध्ये त्याने मोबाईल ऑन केला. नंतर त्याचे लोकेशन थेट छत्तीसगडमध्ये आढळले.

अखेर पोलिसांनी त्याला व आणखी दोघांना छत्तीसगडमधून अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून दिल्लीच्या शोरूममधून लुटलेलं तब्बल 18 किलो सोनं आणि 12.50 लाख रुपयांची कॅश जप्त केली.

 

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments