Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजसराफा दुकानातील कामगाराचा कारनामाः दागिने बनविण्यासाठी दिलेले 9 लाखांचे सोने केले लंपास;...

सराफा दुकानातील कामगाराचा कारनामाः दागिने बनविण्यासाठी दिलेले 9 लाखांचे सोने केले लंपास; फरासखाना ठाण्यात गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुण्यातील सरफाने सराफी दुकानातील एका कामगारास दागिने घडविण्यासाठी साडेनऊ लाख रुपयांचे सोने दिले होते. परंतु संबधित सोने कामगाराने चोरून नेल्याची घटना रविवार पेठेतील सराफ परिसरात घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी रिजाबूल शहा उर्फ साफिक शेख (वय २८, रा. वर्धमान, पश्चिम बंगाल) या आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत साबीर सुकुर मलिक (वय ३६, रा. नाना पेठ) यांनी याबाबत फरासखाना पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साबीर शेख यांचा दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे. आरोपी रिजाबूल शहा त्यांच्याकडे मागील काही दिवसांपासून कामाला होता. त्याला सोन्याचे दागिने बनविण्यासाठी सोने देण्यात आले होते. परंतु शहाने मलिक यांचे लक्ष नसल्याची हेरून नऊ लाख ५९ हजार रुपयांचे सोने परस्पर चोरून नेले. सराफी दुकानातील कपाटात ठेवलेली सोन्याची लगड चोरून आरोपी शहा पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर मलिक यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments