Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज सराफाला पिस्तूलाच्या धाकाने लुटण्याचा प्रयत्नः तीन पिस्तूल, दुचाकी जप्त; सराईत टोळीचा...

सराफाला पिस्तूलाच्या धाकाने लुटण्याचा प्रयत्नः तीन पिस्तूल, दुचाकी जप्त; सराईत टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून पर्दाफाश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

सराफ व्यावसायिकाला पिस्तूलाचा धाक दाखवून मारहाण करीत लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दापाश केला आहे. याप्रकरणी म्होरक्याला अटक करून त्याच्याकडून तीन गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतूस दुचाकी असा मिळून सव्वा लाखांचा ऐवज जप्त केला आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक मीतेश घट्टे उपस्थित होते.

शरद बन्सी मल्लाव (रा. शिरूर ता. शिरूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. शिरूर शहरातील मध्यवर्ती चौकात २८ जानेवारीला रात्री साडेआठच्या सुमारास सराफ व्यावसायिक अशोक कोलथे व त्यांचा कामगार भिका पंडीत (वय ५०) दुकान बंद करत होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी गावठी पिस्तूलाचा धाक दाखवून सराफाच्या दुकानातील सोने लुटण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कामगार भिका यांनी विरोध केल्याने चोरट्यांनी पिस्तूलचा बट त्यांच्या डोक्यात मारला. त्याच्यावर पिस्टलमधून गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपींचा शोध घेतला जात होता.

मुख्य सराफ बाजारपेठेत गुन्हा घडल्याने व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. तपास पथकाने गुन्हयाचे अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संबंधित गुन्हा शरद मल्लाव आणि सागर ऊर्फ बबलु यांनी केल्याचे उघडकीस आले. दोघेही आरोपी हे सिंहगड किल्ल्याचे जंगलात लपून बसले असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने मुख्य आरोपी शरदला ताब्यात घेतले. त्याचा साथीदार सागर ऊर्फ बबलू जखमी असून तो ससूनमध्ये उपचार घेत आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, गणेश जगदाळे, एकनाथ पाटील, प्रदीप चौधरी, अमित सिदपाटील, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीण, सचिन घाडगे, अतुल डेरे, मंगेश थिगळे, योगेश नागरगोजे, दिपक साबळे, अजित भुजबळ, अक्षय नवले, संदीप वारे, अक्षय सुपे, नाथा जगताप, रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, सचिन भोई यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments