Tuesday, February 27, 2024
Home क्राईम न्यूज सराईत चोरट्याला अटक; 8 लाखांचा मुद्देमाल जप्तः 21 गुन्हे दाखल असलेल्या...

सराईत चोरट्याला अटक; 8 लाखांचा मुद्देमाल जप्तः 21 गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस गुन्हे शाखेच्या युनिट-6 ने केले कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे शहरातील कोथरूड, कोंढवा, डेक्कनसह इतर पोलिस ठाण्यात चोरीचे तब्बल २१ गुन्हे असलेल्या सराईत चोराला गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने अटक केली आहे. त्याच्याकडून ४ मोबाईल, पॅनासॉनिक कंपनीचा कॅमेरा आणि एर्टिगा कार असा ८ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राजन गोपाळ नायर (वय-३३, रा. न्यू कोपरे रोड, उत्तमनगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, भैरवनाथ तलावा जवळ मोकळ्या मैदानात संशयास्पदरित्या एक एर्टिगा कार थांबल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पोलीस अंमलदार ताकवणे यांना माहिती होती. सापळा रचून राजन नायर याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे चोरीचे ४ मोबाईल आणि पॅनासॉनिक कंपनीचा कॅमेरा मिळवून आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार असा ८ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नायर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात कोथरूड, वारजे माळवाडी, उत्तमनगर, कोंढवा, फरासखाना, डेक्कन, कोरेगाव पार्क, लोणीकंद पोलीस ठाण्यात जबरी चोरी, दरोडा आदींचे २१ गुन्हे दाखल आहेत. तसेच नायरवर २०१८ साली मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.

सदरची कामगिरी पोलीस सहआयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस अंमलदार विठ्ठल खेडकर, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, प्रतीक लाहिगुडे यांच्या पथकाने केली. याबाबत पुढील तपास कोणी शाखेचे युनिट सहा करत आहे.

RELATED ARTICLES

पुण्यातील नशेचा हादरवणारा व्हिडिओ, वेताळ टेकडीवर नशेत गुंग तरुणी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) प्रत्येक पुणेकरांना विचार करण्याची वेळ आली आहे. अन्यथा शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे शहर उडता पंजाब होईल, नशेचे माहेरघर होईल,...

जेवण वाढताना वाद; महिलेकडून पतीवर चाकूने वार, भवानी पेठेतील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : जेवण वाढताना वाद झाल्याने महिलेने पतीवर चाकूने वार केल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली. याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा...

पुणे : मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट; कामगार संघटनांकडून बंद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : माथाडी कायद्याची राज्यभरात काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसेच बाजार समितीचे केंद्रीकरण करणारे २०१८ चे विधेयक (राष्ट्रीय दर्जा बाजार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पुण्यातील नशेचा हादरवणारा व्हिडिओ, वेताळ टेकडीवर नशेत गुंग तरुणी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) प्रत्येक पुणेकरांना विचार करण्याची वेळ आली आहे. अन्यथा शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे शहर उडता पंजाब होईल, नशेचे माहेरघर होईल,...

जेवण वाढताना वाद; महिलेकडून पतीवर चाकूने वार, भवानी पेठेतील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : जेवण वाढताना वाद झाल्याने महिलेने पतीवर चाकूने वार केल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली. याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा...

पुणे : मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट; कामगार संघटनांकडून बंद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : माथाडी कायद्याची राज्यभरात काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसेच बाजार समितीचे केंद्रीकरण करणारे २०१८ चे विधेयक (राष्ट्रीय दर्जा बाजार...

पुण्यातील तरुणाई ड्रग्सच्या नशेत? रमेश परदेसींकडून हादरवून टाकणारा व्हिडीओ समोर

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक (Pune Drugs) आणि राज्याला हादरवून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. पुण्यातील...

Recent Comments