Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजसराईत गुंड अमित चव्हाण टोळीविरुद्ध मोक्का कारवाई: पीएमपीएल बसमध्ये करीत होते चोऱ्या

सराईत गुंड अमित चव्हाण टोळीविरुद्ध मोक्का कारवाई: पीएमपीएल बसमध्ये करीत होते चोऱ्या

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे शहरातील विविध भागात गुन्हे करणाऱ्या सराईत अमित नाना चव्हाण (टोळी प्रमुख) व त्याच्या महिला साथीदाराविरूध्द मोक्का नुसार कारवाई करण्यात आली आहे. पीएमपीएमएल बसमध्ये उभ्या असलेल्या महिलेच्या हातातील बांगडी चोरून पळताना महिलेसह दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावर्षात पोलिसांनी मोक्कानुसार केलेली ही १५ वि कारवाई आहे.

अमित नाना चव्हाण (वय २७ रा, हडपसर) आणि नेहा बबन सोनवणे, (वय २०, रा. निगडी ओटास्किम निगडी) अशी मोक्कान्सार कारवाई केलेल्या टोळीची नावे आहेत.

बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेच्या उजव्या हातातील सोन्याची बांगडी चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने तोडुन नेली. यावेळी बांगडीसह पळून जात असताना बस मध्ये त्यांना ताब्यात घेण्यात आले. अमित चव्हाण याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली आहे. त्यानी बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीसाठी गैरवाजवी आर्थिक फायदा व इतर फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटीत गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे हिसांचार केला. अवैध आर्थिक फायदयाकरीता, चोरी करणे, जबरीचोरी करणे, दरोडा टाकणे, दुखापत करणे, हत्याराचा धाक दाखवुन लुटणे, विनापरवाना घातक हत्यार जवळ बाळगणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे असे पुन्हा-पुन्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत.

चव्हाण टोळीविरुद्ध मोक्काचा प्रस्ताव शिवाजीनगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी पोलीस उपायुक्त गिल यांच्यावतीने अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील यांना प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी टोळीविरुद्ध मोक्का कारवाई केली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, पोलिस सह आयुक्त प्रवीण पवार, अपर आयुक्त. प्रविणकुमार . पोलीस उप आयुक्त संदिपसिंह गिल्ल, एसीपी साईनाथ ठोंबरे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत सहाएक पोलीस निरिक्षक कैलास डाबेराव, पोलीस उप निरीक्षक अजित बडे, संतोष मेमाणे, रोहित झांबरे, दिलीप नागरे, नलीनी क्षिरसागर, स्वालेहा शेख यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments