Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज सरकारी योजनेतून कर्ज घेताना फसला ! तब्बल आठ लाख रुपयांची फसवणूक

सरकारी योजनेतून कर्ज घेताना फसला ! तब्बल आठ लाख रुपयांची फसवणूक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी : सरकारच्या मुद्रा योजनेतून लोन देतो, असे म्हणून कागदपत्रे घेतली. लोन मंजुरच होणार आहे त्यासाठी विविध कारणे सांगून तब्बल आठ लाख ८२ हजार ४३४ रुपये व्यावसायिकाकडून घेतले. ही घटना गुरुवारी (दि. ५) रावेत येथे घडली. या प्रकरणी गोपिचंद देवराम काटे (वय ४६, रा. काटेवस्ती, पुनावळे, रावेत) यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोपीचंद काटे यांना एका अनओळखी व्यक्तीचा फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने तो मुद्रा फायनान्स एमएसएमई मिनिस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडिया येथून बोलत असल्याने सांगितले. मुद्रा योजने अंतर्गत कर्ज हवे आहे का, अशी विचारणा त्याने केली. गोपीचंद यांनी कर्जाची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यावर संशयिताने त्यांच्याकडून व्हॉट्सअपवर पॅनकार्ड, आधारकार्ड, जीएसटी प्रमाणपत्र, आदी कागदपत्रांचे फोटो मागवून घेतले. तसेच वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादी यांच्याकडून सात लाख ८२ हजार ४३४ रुपये ऑनलाईन पद्धतीने घेऊन फसवणूक केली.

RELATED ARTICLES

शिरूर तालुक्यातील निर्वी येथे अपघातात साठ वर्षीय महिलेचा मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) न्हावरे : निर्वी (ता. शिरूर) गावाच्या हद्दीत निर्वी - कोळगाव डोळस रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोने दुचाकीला धडक देऊन झालेल्या...

पुणे महापालिकेची कारवाई; रस्ते, पदपथ ठिकठिकाणी आढळणारी १३९ बेवारस वाहने जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : महापालिकेच्या हद्दीत रस्ते, पदपथावर ठिकठिकाणी आढळणाऱ्या बंद अथवा बेवारस अवस्थेतील वाहनांविरोधात महापालिका कारवाई करत आहेत. सुरुवातीला या...

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) राजगुरुनगरः चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

शिरूर तालुक्यातील निर्वी येथे अपघातात साठ वर्षीय महिलेचा मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) न्हावरे : निर्वी (ता. शिरूर) गावाच्या हद्दीत निर्वी - कोळगाव डोळस रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोने दुचाकीला धडक देऊन झालेल्या...

पुणे महापालिकेची कारवाई; रस्ते, पदपथ ठिकठिकाणी आढळणारी १३९ बेवारस वाहने जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : महापालिकेच्या हद्दीत रस्ते, पदपथावर ठिकठिकाणी आढळणाऱ्या बंद अथवा बेवारस अवस्थेतील वाहनांविरोधात महापालिका कारवाई करत आहेत. सुरुवातीला या...

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) राजगुरुनगरः चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२...

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा; पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील सर्व आस्थापनांच्या पाट्या देवनागरी लिपीत...

Recent Comments