Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजसरकारी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत विनयभंग

सरकारी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत विनयभंग

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला अश्लील शिवीगाळ करुन विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी 27 जून रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय मध्यवर्ती इमारत पुणे येथे घडला.

याबाबत ४२ वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून आश्रु नामदेव खवळे (रा. राममनोहर, लोहिया नगर, पुणे) याच्याविरोधात विनयभंगासह सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती इमारत पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत. गुरुवारी दुपारच्या सुमारास फिर्यादी कार्यालयात काम करत होत्या, त्यावेळी आरोपी त्या ठिकाणी आला. त्याने मोठमोठ्याने बोलून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

फिर्यादी यांच्या अंगावर धावून जात, तुला आता सरळ करतो, असे म्हणत मोठमोठ्याने आरडाओरडा करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तसेच अश्लील शिवीगाळ करून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास उपनिरीक्षक धनवडे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments