इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुण्यातील खेडमध्ये मनोज जरांगे यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले, सरकारने सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खोटा अजेंडा राबवला. धनंजय मुंडेंना सहआरोपी केलं नाही. सरकाने पद्धतशीरपणे गुंड मित्राला वाचवलं. गुंड मित्राची टोळीही वाचवली. असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर केला आहे.
दरम्यान, बोलत असताना सरपंच संतोष देशमुख प्रकरणात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर चार्जशीट दाखल झाल्याने पुरवणी आरोपपत्रात सहआरोपी होतीलच अशी शंका असल्यामुळे या प्रकरणात धनंजय मुंडेना क्लीनचिट मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत जरांगे पाटलांनी दिले आहेत.
जरांगेंचा आरोप काय?
सरपंच हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्तीची मागणी करण्यात आली होती. मात्र त्यांच्या नियुक्तीच्या दुसऱ्या दिवशीच चार्जशीट दाखल झाल्यामुळे धनंजय मुंडे सहआरोपी होता होता वाचले. सरकारने असा छुपा राजकीय अजेंडा चालवून गुंड आणि राजकिय मित्र वाचवले आहे. सरकारच्या प्रतिनिधींनी पद्धतशीरपणे त्यांचे राजकीय गुंड मित्रासह टोळीही वाचवली आहे. मात्र, पुढे होणाऱ्या तपासात काही सहआरोपी होतात का ते पहावे लागेल. तसे न झाल्यास पुढील काळात त्रास देणा-या टोळीकडे आमची मोहिम वळवली जाईल. असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
या नंतरच्या काळात यांनी कोणाला मारणं, गाड्या अडवणं, प्लॉट हडपणं, खंडण्या मागण्याचे शे प्रकार मराठ्यांसोबत केले तर आम्ही त्यांच्याकडे मोर्चा वळवणार आहोत. असे जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.