इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
नाशिक : समृद्धी महामार्गवर होणाऱ्या अपघातांच्या घटनांनमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नुकतंच मुंबई नागपूर हायवेवर एका मर्सिडीज कारचा भीषण आपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या अपघातात सुनील गणपतराव हेकरे यांचा मृत्यू झाला आहे. ते बांधकाम व्यवसायिक होते. मंगळवारी २४ जून रोजी सकाळी हेकरे आपल्या कुटुंबासोबत एका कार्यक्रमाला मुंबईला गेले होते. कार्यक्रम आटपून हेकरे घरी परतत असताना हा अपघात झाला. आमणे ते कसारा दरम्यान हेकरे यांची मर्सिडीज कार उलटली. त्यांच्या कारच्या बाजूने एक कार जात होती. शेजारची कार अतिवेगात गेल्याने हायवेवरील पाणी हेकरेंच्या कारच्या काचेवर उडाले. हेकरे यांची कार त्यांचा मुलगा अभिषेक चालवत होता. कारच्या काचेवर पाणी उडाल्यामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार उलटली. या भीषण अपघातात हेकरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
तर या अपघातात त्यांची पत्नी सुचेता, मुलगा अभिषेक आणि करण हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुनील हेकरे यांच्या पाश्चात त्यांची पत्नी, दोन मुलांसह भाऊ संदीप, अनिल, बहीण छाया असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे हेकरे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.