इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : शहरातील पर्वती पायथा परिसरातून एक बातमी समोर आली आहे. एका अॅपवरून झालेल्या ओळखीतून मसाज थेरपिस्टची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. चोरट्याने पोलीस असल्याची बतावणी करुन मसाज थेरपिस्टकडील 25 हजारांची रोकड लुटूल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार समीर बेगमपुर असे चोरट्याने सांगितलेले नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील फिर्यातदार तरुण मसाज थेरपिस्ट आहे. तो ग्राहकांच्या घरी जाऊन मसाज करतो. ग्राहक सेवा देण्यासाठी तो समाज मध्यमावरील एका अॅपचा वापर करायचा. समीर बेगमपूर असे नाव सांगितलेल्या चोरट्याने 25 फेब्रुवारीला थेरपिस्ट तरुणाच्या मोबाईल वर संदेश पाठविला होता. त्यामध्ये मसाज करायचा असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या दोघांची भेटीची वेळ ठरली होती.
अधिक माहिती अशी की, समाजमाध्यमातील एका अॅप वरुण फिर्यातदार आणि आरोपी यांची ओळख झाली होती. त्यानंतर पर्वती पायथा परिसरात आरोपी बेगमपुरेने तरुणाची भेट घेतली. त्याच्या विरुद्ध एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे अशी बतावणी करून धमकी दिली. व तरुणाकडून 25 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर आरोपीने तरुणाला दुचाकीवर लक्ष्मीनारायण चित्रपटगृह परिसरातील बँकेच्या एटीएममध्ये नेले. तेथे तरुणाला धमकी देऊन त्याच्याकडून 25 हजार रुपये घेतले व आरोपी दुचाकीवरुन पसार झाला.