Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजसदाशिव पेठेतील महिलेची ५० लाखांची फसवणूक; नेमकं काय घडलं?

सदाशिव पेठेतील महिलेची ५० लाखांची फसवणूक; नेमकं काय घडलं?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने महिलेची ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सदाशिव पेठेतील एका ५६ वर्षीय महिलेने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी १७ जानेवारी रोजी या महिलेच्या मोबाईलवर संदेश पाठविला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी दाखवले.

त्यानंतर त्यांनी महिलेला व्हॉटसअॅपवर लिंक पाठवून एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्या अॅपवर बँक खात्याची माहिती भरून घेतली. चोरट्यांनी महिलेकडून १६ एप्रिलपर्यंत वेळोवेळी पैसे घेतले. परंतु महिलेला कोणताही परतावा दिला नाही.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सायबर पोलिसांनी हा गुन्हा खडक पोलिस ठाण्याकडे तपासासाठी सोपविला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments