Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज सदाशिव पेठेतील घटना: विक्री केलेल्या मोबाईलची रक्कम व दुचाकी घेऊन कामगार लंपास;...

सदाशिव पेठेतील घटना: विक्री केलेल्या मोबाईलची रक्कम व दुचाकी घेऊन कामगार लंपास; 5 लाखांचा मुद्देमाल पळवला

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

विक्री केलेल्या मोबाईलची रक्कम आणि दुचाकी घेऊन कामगार लंपास झाल्याची घटना सदाशिव पेठेतील एका मोबाईल विक्रीच्या दुकानात घडली. याप्रकरणी जगदीश आसवानी (वय-४९, रा. पिंपरी) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार वैजनाथ कांबळे ऊर्फ पिंटू (वय-३९, रा. संजय गांधी नगर, काळेवाडी, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना नारायण पेठ येथे घडली आहे अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, तक्रारदार जगदीश आसवानी यांचे सदाशिव पेठ येथे कोअर मोबाईल नावाने मोबाईल विक्रीचे दुकान आहे. फिर्यादी आसवानी यांनी २६ जानेवारी रोजी एका ग्राहकाला तीन आयफोन १५ प्रो मॅक्सची विक्री केली होती. या मोबाईलच्या बिलाचे पैसे ग्राहकाने नारायण पेठेतील संस्कृती हॉटेल मध्ये ठेवले होते.

फिर्यादी यांच्या दुकानात काम करणाऱ्या वैजनाथ कांबळे याला दुचाकी घेऊन मोबाईलचे बिलाचे पैसे आणायला संस्कृती हॉटेल येथे पाठवले होते. त्यावेळी आरोपी कांबळे याने मोबाईल विक्रीचे ग्राहकाकडून मिळालेले ३ लाख ७० हजार ७०० रुपये आणि १ लाख २५ हजाराची दुचाकी असा ४ लाख ९५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन पळाला असल्याचे फिर्यादेत सांगण्यात आले आहे. संबंधित कामगाराचा तक्रारदार यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो मिळून आला नाही. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे करत आहेत.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments