इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
सासवड : सिनेअभिनेते अमीर खान यांच्या पाणी फाउंडेशन ‘सत्यमेवजयते’ फार्मर कप स्पर्धा 2024 चा निकाल नुकता जाहीर झाला आहे. यामध्ये परिंचे येथील शिवशंभो शेतकरी गटाने पुरंदर तालुक्यामधून प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याबरोबर गेली अनेक वर्ष सातत्याने समूह शेती करून कमी खर्च आणि जास्त उत्पादन घेणारे याच परिसरातील मांढर मधील अंबिका शेतकरी गट आणि किल्ले पुरंदर भात उत्पादक गटाला संयुक्तपणे द्वितीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे येथे आयोजित कार्यक्रमात राज्यातील फार्मर कप स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान, संचालिका किरण राव, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ तसेच राज्यातील स्पर्धक आणि विविध मान्यवर उपस्थित होते.
परिंचे येथील शिवशंभो शेतकरी गटाला 50 हजार रुपयांचे रोख पारितोषिक तसेच प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह त्याचप्रमाणे मांढरमधील अंबिका शेतकरी गट आणि किल्ले पुरंदर भात उत्पादक गटाला प्रत्येकी 25 हजाराचे रोख पारितोषिक प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. मी 2017 पासून पाणी फाउंडेशन चळवळीला जोडलो गेलो आहे, इतर वर्षी एकदा भारतात येऊन गावातील शेतकऱ्यांना भेटून एक नवीन ऊर्जा मिळते आणि त्यांना मदत करून, परदेशी राहून ही मातृभूमी प्रति असलेल्या कर्तव्य पुरतीचे समाधान मिळते. यावर्षी पुरंदर मधून प्रथम येणाऱ्या शेतकरी गटाला पेरणीसाठी उपयुक्त असलेले बीबीएफ मशीन अंदाजे 80 हजार देणार असे संजय जोशी, न्यूझीलंड. यांनी सांगितले.
यावर्षी खरीप हंगामात सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना आव्हानाचा सामना करावा लागला, खूप उत्साहात पुरंदरमध्ये काम सुरू झाले. पण शेतीमध्ये नेहमीच येणाऱ्या अडचणी आणि त्यात उशीरा सुरू झालेला पाऊस, यावर शिवशंभो शेतकरी गटाने जिद्द व चिकाटीने मात केली. अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत एकमेकांना सोबत घेऊन काम केले आणि शेतीचे उत्पादन दुप्पट केले. त्यांना मिळालेला पुरस्कार हा त्यांनी केलेल्या यशस्वी नियोजनाचे. प्राबल्य आहे. असे मत पाणी फाउंडेशनचे समन्वयक मयूर साळुंखे यांनी व्यक्त केले.