Thursday, March 20, 2025
Homeक्राईम न्यूजसतीश वाघ प्रकरणी धक्कादायक माहिती आली समोर ; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण...

सतीश वाघ प्रकरणी धक्कादायक माहिती आली समोर ; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः पुण्यातून आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या खुनाप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. सतीश वाघ यांचा ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून खून करण्यात आला होता. त्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकून देण्यात आला. या प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांना संपवण्यासाठी त्यांची पत्नी मोहिनी आणि तिचा प्रियकर अक्षय जवळकर हे दोघे जवळपास एका वर्षापासून नियोजन करत होते. त्यांच्या दोघांवर सतीश वाघ यांना संशय आल्याने त्या दोघांना घरात भेटता येत नव्हते. घरात भेटता येत नसल्यामुळे ते एका लॉजवर भेटत असायचे अशी धक्कादायक धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबरोबरच सतीश वाघ यांचा खून करण्याअगोदर त्यांची पत्नी आरोपी मोहिनीने एका मांत्रिक महिलेची वाघ यांना आपल्या वाटेतून बाजूला करण्यासाठी मदत घेतली असल्याची माहिती समोर येत आहे.

आरोपपत्रात धक्कादायक खुलासे…

आता या प्रकरणात गुन्हे शाखेकडून लष्कर न्यायालयात एक हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी अक्षय आणि मोहिनीसह अतिश जाधव, पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे आणि विकास शिंदे या सहा जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. यातुन धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. आरोपी अक्षयने खुनाची सुपारी पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे आणि विकास शिंदे यांना दिली. त्यांनी तीन वेळा वाघ यांची रेकी केली. सर्वांत अगोदर मारेकऱ्यांनी दुचाकीवरून येऊन ठार करण्याचे ठरवले होते. मात्र, परिसरात गर्दी पाहता हे त्यांना शक्य झाले नाही. त्यानंतर मारेकऱ्यांनी त्यांची रेकी केली. संधी मिळाल्यानंतर त्यांचं अपहरण केलं आणि त्यांच्यावर चारचाकी गाडीमध्ये नेऊन त्यांच्यावर वार करून त्यांना ठार करण्यात आले. त्यांनंतर त्यांना शिंदवणे घाटातील निर्जन स्थळी फेकून दिण्यात आले.

आरोपपत्रातून आणखी एक माहिती समोर आली आहे. टी म्हणजे सतीश वाघ यांची सुपारी पाच लाख रुपयांना देण्यात आली होती. महत्त्वाचे म्हणजे या सुपारीतील एकही रुपया त्यांची पत्नी मोहिनीने दिला नव्हता. आरोपी अक्षय जवळकरने आपल्याजवळील दीड लाख रुपये सुरुवातीला अॅडव्हान्स म्हणून मारेकरी शर्माच्या बँक खात्यावर पाठवले होते. त्यानंतर शर्मा आणि त्याच्या साथीदारांनी सतीश वाघ यांचा खून केल्यानंतर त्याच दिवशी बाकीचे पैसे अक्षयने शर्माच्या घरी जाऊन दिले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments