Tuesday, February 27, 2024
Home क्राईम न्यूज संशोधन संस्थांनी क्लिनिकल चाचण्यांमध्ये सामील व्हावेः डॉ. अमोल कारा यांचे आवाहन;...

संशोधन संस्थांनी क्लिनिकल चाचण्यांमध्ये सामील व्हावेः डॉ. अमोल कारा यांचे आवाहन; पुणे विद्यापीठात परिषद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

माइटोकॉन्ड्रियल रोगाच्या अनुवांशिकदृष्ट्या पुष्टी झालेल्या रुग्णांची पुरेशी संख्या असलेल्या क्लिनिकल चाचणी साइटची कमतरता आहे. या विषयावर तातडीने लक्ष देण्याची गरज असून जगभरातील चिकित्सक आणि संशोधन संस्थांनी मायटोकॉन्ड्रियल रोग उपचारांसाठीच्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये सामील व्हावे, असे आवाहन आनुवंशिकता आणि माइटोकॉन्ड्रियल आजारांच्या तज्ज्ञ आणि हार्वर्ड स्कूल ऑफ मेडिकलमधील प्राध्यापिका डॉ. अमोल कारा यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागातर्फे ‘बायोलॉजी बियॉन्ड बाऊंडरीज’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी एक सत्रात त्या बोलत होत्या. या प्रसंगी या परिषदेचे मुख्य आयोजक प्रा. (डॉ.) राजेश गच्चे आणि जैवतंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. स्मिता झिगांर्डे उपस्थित होत्या.

माइटोकॉन्ड्रियल रोग हे जटिल अनुवांशिक विकारांचे एक समूह आहे. ज्यामुळे अनेक अवयवांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याचे डॉ. अमोल कारा यांनी यावेळी सांगितले. तसेच यामुळेच या आजाराच्या निदान आणि उपचारामध्ये अनेक आव्हाने येतात. माइटोकॉन्ड्रियल जीवशास्त्र समजून घेण्याची व्यवस्था उपलब्ध असूनही या दुर्बल परिस्थितीसाठी अजूनही प्रभावी उपचार विकसित होऊ शकला नसल्याची खंत डॉ. कारा यांनी यावेळी व्यक्त केली.

विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठाचा बायोटेक्नॉलजी विभाग, अमेरिकेतील रटगर्स स्कूल ऑफ बायोमेडिकल अँड हेल्थ सायन्सेस आणि रोझवेल पार्क कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

माइटोकॉन्ड्रिया, सेल डेथ आणि मानवी रोग, मानवी रोग व्यवस्थापनातील संगणकीय यश आणि आरोग्यसेवेतील मूलभूत आणि वैद्यकीय संशोधन आणि परिवर्तन या सर्व प्रमुख क्षेत्रांमध्ये अलीकडील प्रगती अधोरेखित करणे, हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेत जगभरातून ५० हून अधिक शास्त्रज्ञांनी सार्वजनिक आरोग्याविषयी चर्चा केली.

RELATED ARTICLES

ईडी, सीबीआयचा वापर करून लोकशाहीवर घावः शरद पवार यांची महायुतीवर जोरदार टीका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या 'मोदी गॅरंटी' अशी जाहिरात करत आहेत. मात्र, त्यामधील एकही आश्वासन त्यांनी प्रत्यक्षात पूर्ण केलेले...

तिघांविरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलः बांधकाम सुरू असलेल्या गृहप्रकल्पाच्या सहाव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्देवी मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) बांधकाम सुरू असलेल्या एका गृहप्रकल्पात काम करणारा मजूर सहाव्या मजल्यावरून पडून दुर्देवीरीत्या मयत झाल्याची घटना मुंढवा भागात घडली. मजुराच्या...

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले: जे काम बंदुकीची गोळी करू शकत नाही ते काम अमली पदार्थ करतात; पुणे पोलिसांची कारवाई अभिमानास्पद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई केली असून ती अभिमानास्पद आहे. नजीकच्या काळातील देशातील ही सर्वात मोठी कारवाई...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

ईडी, सीबीआयचा वापर करून लोकशाहीवर घावः शरद पवार यांची महायुतीवर जोरदार टीका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या 'मोदी गॅरंटी' अशी जाहिरात करत आहेत. मात्र, त्यामधील एकही आश्वासन त्यांनी प्रत्यक्षात पूर्ण केलेले...

तिघांविरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलः बांधकाम सुरू असलेल्या गृहप्रकल्पाच्या सहाव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्देवी मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) बांधकाम सुरू असलेल्या एका गृहप्रकल्पात काम करणारा मजूर सहाव्या मजल्यावरून पडून दुर्देवीरीत्या मयत झाल्याची घटना मुंढवा भागात घडली. मजुराच्या...

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले: जे काम बंदुकीची गोळी करू शकत नाही ते काम अमली पदार्थ करतात; पुणे पोलिसांची कारवाई अभिमानास्पद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई केली असून ती अभिमानास्पद आहे. नजीकच्या काळातील देशातील ही सर्वात मोठी कारवाई...

फायनान्सची वसुली करणाऱ्यांकडून रिक्षा चालकाला मारहाणः भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) फायनान्सचे बाऊन्सिंग चार्जेस भरले नसल्याने फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्यांनी रिक्षा ताब्यात मागितली. त्यावेळी रिक्षा देण्यास नकार दिल्याने तिघांनी रिक्षा...

Recent Comments