Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजसंविधान संपविण्याचा भाजपचा डाव ; डॉ. नितीन राऊत

संविधान संपविण्याचा भाजपचा डाव ; डॉ. नितीन राऊत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : “भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला विघातक वातावरणाकडे घेऊन जात आहेत. अब की बार ४०० पार ही घोषणा देशाचे संविधान बदलण्यासाठीच दिली आहे. एका बाजूला मोदी सर्व प्रकारची गॅरंटी देत आहेत. मात्र त्यांच्या जाहीरनाम्यात संविधानाची गॅरंटी नाही. त्यामुळेच संविधान बदलण्याचा त्यांचा डाव असल्याचे दिसत आहे,” असा आरोप माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शुक्रवारी केला.

पुणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी डॉ. राऊत पुण्यात आले आहेत. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी प्रवक्ते गोपाळ तिवारी, सुजित यादव, गौतम वानखेडे, राज अंबिके आदी उपस्थित होते.

डॉ. राऊत म्हणाले, “संपूर्ण देशात अंडर करंट दिसून येत आहे. उत्तर प्रदेशसहित अन्य राज्यांमध्ये ही स्थिती आहे. आतापर्यंत तीन टप्प्यांचे मतदान पार पडले आहे. यामधून भाजपविरोधी वातावरण स्पष्टपणे जाणवत आहे. याची जाणीव झाल्यानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मानसिकता बिघडलेली दिसत आहे. त्यांची वक्तव्ये पाहता त्यांना पराजित होण्याची मोठी चिंता दिसत आहे. पुण्यामध्येदेखील कॉग्रेस तसेच महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण आहे.”

एससी, एसटी विद्यार्थ्यांना विदेशी विद्यापीठांमध्ये शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाची अट लावली, हा अतिशय चुकीचा निर्णय आहे. यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही. राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार दलित व मागासवर्गीयांचे आरक्षण संपुष्टात आणण्याचे कारस्थान करत आहेत, असेही ते म्हणाले.

सोशल इंजिनिअरिंगचा पुण्यात प्रयोग

कॉग्रेस पक्षाने पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवार देताना सगळ्या बाबींचा विचार केला आहे. पहिल्यांदा ओबीसी उमेदवार देऊन सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केला गेला आहे. सामान्य लोकांच्या प्रश्नावर पोटतिडकीने काम करणारा उमेदवार कॉग्रेसने दिला. पुणेकर मतदार अत्यंत सूज्ञ आहेत. फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेवर चालणारे हे शहर आहे. त्यामुळे या वेळी ते योग्य निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments